Viral Video : बैलासोबत व्हिडिओ बनवणं पडलं महागात; विदेशी महिलेसोबत भयकंर घडलं, घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल, VIDEO

woman making reel with bull viral video: रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलासोबत व्हिडिओ बनवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही क्षणातच बैलाची अचानक प्रतिक्रिया पाहून महिला गोंधळून जाते.
woman making reel with bull viral video
woman making reel with bull viral videosaam tv
Published On

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही पाहून लोक थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलासोबत व्हिडिओ बनवत असते. मात्र काही क्षणातच बैलाची रिएक्शन पाहून ती स्वतःच गोंधळून जाते.

आजकाल सेल्फी आणि व्हिडिओ बनवण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलीये. अनेकदा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोकं रिस्कही घेताना दिसतात. असाच एका बैलाबरोबर एक महिला व्हिडीओ बनवत असताना तिला हा अनुभव आला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

woman making reel with bull viral video
Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर उभ्या असलेल्या बैलाच्या अगदी जवळ जाऊन त्याच्यासोबत व्हिडिओ बनवत असल्याचं दिसते. सुरुवातीला सगळं शांत दिसत असलं तरी काही क्षणातच बैल तिला टक्कर मारताना दिसतो. बैलाच्या त्या अचानक प्रतिक्रिया पाहून महिला घाबरून जाते आणि काही क्षणासाठी ती गोंधळते. हा संपूर्ण प्रसंग काही सेकंदांत घडतो.

woman making reel with bull viral video
Viral Video: हायकोर्ट आहे की कुस्तीचा आखाडा? पुरूष वकिलाची महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ‘wander_and_rise’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अपलोड झाल्यानंतर काही वेळातच याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी तो लाईकही केला आहे.

woman making reel with bull viral video
Viral Video: नवरीच्या एन्ट्रीला आतषबाजी लावणं पडलं महागात; थोडक्यात वाचला जीव, पाहा व्हिडीओ

व्हिडिओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या प्रसंगावर आश्चर्य व्यक्त केलंय. एका युजरने लिहिलंय की, 'बैलाने तर एका क्षणात संपूर्ण वातावरण बदलून टाकलं.' तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की, 'अशा प्रकारे प्राण्यांच्या जवळ जाऊन व्हिडिओ बनवणं'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com