Throat Infection : सकाळी उठल्यानंतर घशात खवखव होते? हे घरगुती उपचार करुन पाहाच

Winter Care Tips : वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे घशात खवखव होणे, आवाज बसणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बरेचदा सकाळी उठल्यानंतर आपला घसा दुखू लागतो किंवा घसा खवखवू लागतो.
Throat Infection
Throat InfectionSaam Tv
Published On

Home Remedies For Throat Infection :

हिवाळा सुरु झाल्यानंतर वातावरणात बदल होतो ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम देखील होतो. सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे घशात खवखव होणे, आवाज बसणे आणि जळजळ होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. बरेचदा सकाळी उठल्यानंतर आपला घसा दुखू लागतो किंवा घसा खवखवू लागतो. ही समस्या घशात इन्फेक्शन झालेली असण्याची शक्यता असते. प्रदूषण आणि धुरामुळे घशात इन्फेक्शन अथवा संसर्ग होऊ शकतो.

कधी कधी हा त्रास इतका वाढतो की, आपल्याला नीटसे बोलता येत नाही. त्यामुळे खोकला आणि कर्कश आवाज येतो. तसेच श्वास घेण्यासही अडचण होते. काही घरगुती उपायांचा (Home remedies) वापर करुन यापासून सुटका मिळवू शकतो.

1. मध

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून (Disease) आराम मिळवण्यासाठी याचे सेवन करु शकता. दररोज दोन ते तीन चमचे मधाचे सेवन केल्याने घशातील श्लेष्मा निघून जाण्यास मदत होईल. तसेच घसा खवखवण्यापासून सुटका होईल.

Throat Infection
Winter Care Tips : हिवाळ्यात गुडघे आणि सांधे दुखीचा त्रास वाढलाय? असू शकते कॅल्शियमची कमतरता, वेळीच घ्या काळजी

2. गरम पाण्याची वाफ

नाक जाम झाले असेल तर घसा दुखत असेल किंवा खोकला होत असेल तर सर्वप्रथम गरम पाण्याची (Water) वाफ घ्या. गरम पाण्यासोबत वाफ घेतल्याने बंद झालेला घसा दुखीपासून आराम मिळेल. ज्यामुळे श्वास नीट घेता येईल.

3. कोमट पाणी प्या

घसा दुखत असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून त्याने गुळणा करा. त्यामुळे घसादुखीपासून सुटका होईल.

Throat Infection
Hair Loss Causes : या कारणांमुळे सुरु होते केसगळती, तुम्ही देखील ही चूक करत नाही ना?

4. लवंग

लवंगात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. घसादुखीपासून आराम मिळण्यासाठी लवंगाचे सेवन करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com