winter bone care
winter joint painsaam tv

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या कारणं अन् रामबाण उपाय

Joint Care: हिवाळ्यात रक्तप्रवाह कमी होऊन सांध्यांची लवचिकता घटते आणि वेदना वाढतात. थंडीत जुनी दुखापत, कडकपणा व सूज अधिक जाणवते. उबदार ठेवणे, स्ट्रेचिंग, पौष्टिक आहार आणि गरम सिकाई अत्यंत फायदेशीर.
Published on

हिवाळ्यातली थंडगार हवा सुरू होताच शरीरावर सर्वात पहिला परिणाम जाणवतो तो म्हणजे सांधेदुखी. सुरुवातीला हलक्या वेदना जाणवतात, पण तापमान आणखी खाली गेल्यावर गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या दुखापतींचे भाग पुन्हा त्रास पुन्हा सुरु होतात. अनेकजण याला वय किंवा शारीरिक कमजोरीचे कारण मानतात, पण यामागचे खरे कारण खूप वेगळं आहे.

थंडी वाढल्यावर शरीरातल्या नसांचे आकुंचन होते आणि रक्तप्रवाह मंदावतो. रक्त नीट पोहोचत नाही तेव्हा सांध्यांची लवचिकता कमी होते आणि ते ताठ, जास्त वेदनादायक वाटतात. त्यामुळे हिवाळा सुरू झाल्यावर शरीर जणू गोठत चाललंय की काय असं वाटतं.

जुने फ्रॅक्चर किंवा दुखापत असलेले भाग हिवाळ्यात जास्त संवेदनशील होतात. तापमान कमी होताच त्या जागी पुन्हा सूज, वेदना आणि ताठपणा जाणवू लागतो. त्यामुळे अनेकांसाठी थंडीचा काळ आरामापेक्षा अधिक सावधगिरीची सूचना घेऊन येतो. मात्र काही सोप्या उपायांनी या त्रासात मोठा दिलासा मिळू शकतो.

winter bone care
Pune Winter Tourism: हिवाळ्यात फिरायला कुठे जाल? पुण्याजवळ आहेत 8 Hidden सुंदर पिकनिक स्पॉट्स, जाणून घ्या

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंड हवेत सांध्यांचा कडकपणा वाढतो, त्यामुळे लेयरमध्ये कपडे घालणे, मोजे, टोपी आणि ग्लव्ज वापरणं शरीराचं तापमान कायम ठेवण्यास मदत करतं. घरात बसल्यावर चटई, गोधड्या किंवा हीटिंग पॅडचा वापर केल्यास सांध्यातील जकडण कमी होते. घराचे खोली तापमान खूप थंड ठेवू नये, कारण थंड हवा सांधेदुखी वाढवते. तसेच जमेल तितका व्यायाम करणे सुद्धा गरजेचे आहे.

या काळात हलकी हालचाल आणि व्यायाम करणे तितकेच गरजेचे आहे. अनेकजण थंडीत आळसामुळे कमी हालचाल करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होऊन सांधेदुखी वाढते. हलकी स्ट्रेचिंग, योग किंवा थोडा वेगाने चालणे यामुळे सांध्यांतील लवचिकता वाढते आणि वेदना कमी होतात. एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्यास stiffness वाढते, त्यामुळे मधेमधे उठून चालणे गरजेचे आहे.

winter bone care
Aho Meaning: लग्नानंतर बायको "अहो" का म्हणते? शब्दाचा अर्थ वाचून तुम्हीही व्हाल थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com