Kidney stone prevention: किडनी स्टोनचा धोका का वाढतो? ही छोटी चूक ठरते मोठ्या आजाराचं कारण

Dehydration kidney risk: उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका का वाढतो आणि तो टाळण्यासाठी कोणते सोपे उपाय करावेत हे या लेखात स्पष्ट केले आहे. पाणी पिण्याच्या सवयी, आहारातील बदल आणि आरोग्य टिप्स याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Kidney Stone Symptoms
Kidney Stone Symptoms meta ai
Published On

किडनी स्टोन म्हणजे किडनीत तयार होणारे कठीण छोटे-छोटे खडे असतात. उन्हाळ्यात शरीरातून घाम जास्त निघतो आणि पाणी कमी प्यायलं जातं. त्यामुळे लघवी कमी प्रमाणात तयार होते. अशावेळी शरीरातील खनिजं जास्त घट्ट होऊन खडे तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढताना दिसते.

किडनी स्टोन होण्याची कारणं

किडनी स्टोन मुख्यतः शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे तयार होतो. उन्हाळ्यात लोक घामामुळे पाणी जास्त गमावतात, पण तेवढं पाणी पित नाहीत. त्यामुळे लघवी कमी तयार होते आणि त्यात असलेली खनिजे अधिक एकत्रित होऊन खडे बनतात.

Kidney Stone Symptoms
Best Exercises: डॉक्टरांनी सुचवले डायबेटीस, BP आणि हार्ट पेशंटसाठी 5 सर्वोत्तम व्यायाम

याशिवाय दैनंदिन सवयी आणि काही आरोग्यस्थितीमुळेही धोका वाढतो. कमी पाणी पिणं, जास्त मीठ असलेला आहार घेणं, प्रोटीन विशेषतः मांसाहाराचे जास्त सेवन, वारंवार होणारं युरीन इन्फेक्शन, कुटुंबात किडनी स्टोनचा इतिहास, स्थूलपणा किंवा मेटाबॉलिक समस्या, आधी कधी स्टोन झाला असणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन सी घेणं यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

किडनी स्टोन टाळण्यासाठी उपाय

दिवसभर पुरेसं पाणी पिणं

फक्त 8–10 ग्लास पाणी पिणं पुरेसं नाही तर ते दिवसभर समान प्रमाणात घेतलं पाहिजे. सकाळी उठल्यावर सुमारे 500 मिली पाणी घरातून बाहेर पडण्यापूर्वी 500 मिली, कामाच्या वेळेत 1 ते 1.5 लिटर, संध्याकाळी 500 ते 700 मिली आणि झोपण्यापूर्वी गरजेनुसार थोडं पाणी घेणं उपयुक्त आहे.

मीठाचं प्रमाण कमी ठेवा

जास्त मीठामुळे लघवीत कॅल्शियम वाढतं आणि स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पॅकेज्ड स्नॅक्स, चिप्स, पापड, लोणचे, खारट पदार्थ, फास्ट फूड आणि वारंवार बाहेरचं जेवण टाळणं गरजेचं आहे.

Kidney Stone Symptoms
Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

कॅल्शियम पूर्णपणे बंद करा

काही लोक किडनी स्टोन झाल्यावर दूध किंवा दही बंद करतात पण हे चुकीचे आहे. आहारात खूप कमी कॅल्शियम घेतल्यास शरीर जास्त ऑक्सलेट शोषून घेते आणि त्यामुळे काही प्रकारचे स्टोन वाढू शकतात.

सिट्रस फळांचा समावेश करा

लिंबू पाणी काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतं. कारण त्यातील सिट्रेट स्टोन तयार होण्याचा धोका कमी करू शकतो.

मांसाहाराचे अतिसेवन टाळा

लाल मांस, ऑर्गन मीट आणि सतत जड मांसाहारी आहार घेतल्याने शरीरात युरिक अॅसिड वाढू शकतं. ज्यामुळे काही प्रकारचे स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे.

Kidney Stone Symptoms
Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com