Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी सुचवलेला 10 दिवसांचा डाएट प्लॅन जाणून घ्या. योग्य वेळेवर आहार, फास्टिंग आणि साध्या सवयींच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
Belly fat reduction
Belly fat reductionsaam tv
Published On

आजकाल वाढतं वजन ही अनेकांची मोठी समस्या बनलीये. विशेषतः पोट आणि कंबरेभोवती साचलेली चरबी कमी करणं अनेकांसाठी आव्हान ठरलंय. कामाचा ताण, अनियमित दिनचर्या आणि व्यायामासाठी वेळ न मिळणं यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं आणखी कठीण होतं. मात्र काही वेळा आहारात योग्य बदल करूनही वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. उपासना व्होरा यांनी अशाच एका खास डाएट प्लॅनची माहिती दिलीये. त्यांच्या मते, हा प्लॅन सलग 10 दिवस पाळल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. इतकंच नाही तर पोटावरील चरबीही कमी होण्यासही मदत होते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन कसा मदत करतो?

डॉ. उपासना व्होरा यांच्या मते, ज्यांचं वजन जास्त वाढलंय किंवा जास्त प्रमाणात बेली फॅट आहे त्यांनी, त्यांनी हा डाएट प्लॅन 10 दिवस करून पाहावा. त्यांचा दावा आहे की, यामुळे सुमारे 5 किलोपर्यंत वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. तसंच पोट आणि कंबरेभोवती साचलेली चरबी 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे नियमित व्यायामासाठी पुरेसा वेळ नसतो, त्यांच्यासाठीही हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो.

दिवसाची सुरुवात कशी करावी?

डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यावं. हे पाणी चहाप्रमाणे हळूहळू घोट घेत प्यायचंय. यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळते, पचनसंस्था एक्टिव्ह होते आणि शौचासही सुलभ होतं. तसंच शरीराचा चयापचय सुधारण्यासही मदत होते.

Belly fat reduction
Brain Tumor Warning Signs: कोणत्या व्यक्तींना असतो ब्रेन ट्युमर सर्वाधिक धोका? सुरुवातीला दिसणारी ही लक्षणं जाणून घ्या

सकाळचा नाश्ता कधी आणि काय घ्यावा?

या डाएटनुसार सकाळी 10 नंतरच खाण्याची सुरुवात करायची आहे. नाश्त्यामध्ये सिझननुसार उपलब्ध असलेलं कोणतेही एक फळ खावं. फळांचा रस पिण्याऐवजी पूर्ण फळ खाल्लं पाहिजे. पूर्ण फळ खाल्ल्याने शरीराला फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळतात.

दुपारचं जेवण किती वाजता घ्यावं?

दुपारचं जेवण साधारण अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान घ्यावे. यामध्ये घरचं नेहमीचं जेवण खाऊ शकता. उदाहरणार्थ, डाळ, भात, भाजी आणि पोळी यांचा समावेश असू शकतो. यासोबत थोडे सलाड घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो. या वेळी पोटभर जेवण करण्यास हरकत नाही.

Belly fat reduction
Mosquito bites: काही लोकांना डास अधिक का चावतात?

संध्याकाळी 5 नंतर खाणं टाळा

या डाएट प्लॅनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसातील शेवटचं खाणं पूर्ण करणं. या वेळी पोहे, उपमा, इडली किंवा सँडविच यापैकी कोणताही हलका आणि घरगुती पदार्थ खाऊ शकता. शक्यतो कमी तेलाचा आणि पौष्टिक पर्याय निवडावा.

संध्याकाळी 5 नंतर कोणताही खाद्यपदार्थ खाऊ नये. फक्त पाणी प्यावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 किंवा 12 वाजल्यानंतरच पुन्हा पहिला आहार घ्यावा. अशा प्रकारे दररोज फास्टिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते आणि पोटावरील चरबीही हळूहळू घटू शकते.

Belly fat reduction
Dengue during pregnancy: पावसाळा सुरू होताच डेंग्यूचा धोका वाढतो, तज्ज्ञांनी सांगितलं गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com