Surabhi Jayashree Jagdish
घोळक्यात बसलं असताना काही लोकांनाच फक्त डास चावतात. यावेळी कधी प्रश्न पडलाय का की, काही ठराविक लोकांनाच का अधिक डास चावतात? यामागची कारणं जाणून घेऊया
ज्या व्य लोक वेगाने श्वास घेतात किंवा जास्त प्रमाणात CO2 बाहेर टाकतात, त्यांच्याकडे डास पटकन आकर्षित होतात. डासांना कार्बन डायऑक्साइडचा वास सहज कळतो.
म्हणून असे लोक डासांचं सोपं लक्ष्य ठरतात.
ज्यांच्या शरीराचं तापमान सामान्यपेक्षा अधिक असतं, त्यांना डास जास्त चावतात. उष्णता डासांना लवकर आकर्षित करते. त्यामुळे गरम शरीर असलेल्या लोकांभोवती डास जास्त फिरतात.
जास्त घाम येणाऱ्या लोकांकडे डास पटकन आकर्षित होतात. घामामध्ये लॅक्टिक अॅसिड, युरिक अॅसिड आणि अमोनिया असतो. हे घटक डासांना खूप आवडतात.
गर्भवती महिला सामान्य लोकांपेक्षा सुमारे 21% जास्त CO2 बाहेर टाकतात. यामुळे डास त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. त्यांना डास चावण्याचा धोका अधिक असतो.
दारू पिणाऱ्या लोकांनाही डास जास्त आकर्षित होतात. मद्यपानामुळे शरीरातील काही बदल डासांना जाणवतात. त्यामुळे डास चावण्याचं प्रमाण वाढतं.
काळे किंवा निळे कपडे घालणाऱ्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. गडद रंग डासांना सहज दिसतात. म्हणून अशा कपड्यांमुळे डास जास्त चावू शकतात.