Blood Clot: शरीरात 'ही' 7 लक्षणं दिसली तर समजा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यात

Surabhi Jayashree Jagdish

रक्ताची गुठळी

मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होण्याला सेरेब्रल थ्रोम्बोसिस किंवा एम्बोलिझम म्हणतात. रक्तप्रवाहात अडथळा आल्याने ही परिस्थिती निर्माण होते. जर हा त्रास वाढला तर स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे मेंदूत रक्ताच्या गुठळ्या होण्याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात.

Cerebral Thrombosis

तीव्र डोकेदुखी

मेंदूतील रक्ताच्या गुठळीमुळे अचानक डोकेदुखी होऊ शकते. ही वेदना स्ट्रोकच्या काही आठवडे आधी सुरू होऊ शकते आणि काही तास टिकू शकते. औषधोपचार करूनही ही वेदना कमी होत नाहीत.

Stroke Symptoms

एका बाजू सुन्न होणं

रक्ताच्या गुठळ्या होण्याचं आणखी एक लक्षण म्हणजे शरीराच्या एका भागात बधिरता जाणवणे. हात, पाय किंवा चेहऱ्यावर बधिरता येऊ शकते. मेंदूतील गुठळीमुळे येणाऱ्या पक्षाघाताचे हे एक प्रमुख लक्षण असू शकते.

Brain Clot Warning Signs

तोल जाणं

रक्ताच्या गुठळीमुळे उभे राहण्यास किंवा जास्त वेळ उभं राहण्यास अडचण येऊ शकते. अशावेळी व्यक्तीचा तोलही जाऊ शकतो. त्यामुळे चालणंही कठीण होऊ शकतं.

Severe Headache

बोलण्यामध्ये अडचण

मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे अचानक बोलण्यात अडचण येऊ शकते. बोलणं अस्पष्ट होऊ शकतं. अशावेळी समोरची व्यक्ती काय म्हणतेय हे समजण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते.

Numbness In Body

दृष्टी धुसर होणं

मेंदूतील रक्ताच्या गुठळीमुळे दृष्टीच्या समस्या एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अंधुक दिसणे किंवा दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. जर तुम्हाला हा त्रास झाला तर डॉक्टरांची मदत घ्या.

Balance Problems

गोंधळ उडणं

मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यास समजण्यात अडचण येणं, समन्वय बिघडणं किंवा गोंधळ उडणं यांसारखी लक्षणं दिसतात. त्या व्यक्तीला इतरांचे बोलणं समजणं कठीण वाटू शकतं.

Speech Difficulty

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा