Post C-section bloating: प्रसूतीनंतर पोट फुगण्याची तक्रार का वाढते? डॉक्टरांनी सांगितले समस्येचे सोपे उपाय

C-section recovery : सी सेक्शननंतर महिलांना पोट फुगणं, गॅस आणि जडपणा जाणवू शकतो. भूल, कमी हालचाल आणि बद्धकोष्ठता ही प्रमुख कारणं आहेत. योग्य आहार, पाणी आणि हलका व्यायाम केल्यास ही समस्या कमी होऊ शकते अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
C-section recovery
C-section recoverysaam tv
Published On

शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यानंतर महिलांना बरं होण्याच्या प्रक्रियेत काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं कारण प्रसूतीनंतर महिलांच्या हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. साधारणपणे, शस्त्रक्रियेनंतर महिलांना पोट फुगणं, गॅस होणं आणि पोटात जडपणा जाणवणं यांसारख्या समस्या जाणवू शकतात. यामागची कारणं काय आहे याची माहिती नवी मुंबईतील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील प्रसूती आणि स्त्रीरोग सल्लागार डॉ. सुकीर्ती जैन यांनी ओनली माय हेल्थ बेवसाईटला दिलीये.

डॉ. जैन म्हणाल्या की, शस्त्रक्रियेनंतर सहसा ही समस्या तात्पुरती असते आणि योग्य काळजी घेतल्यास ती हळूहळू बरी होते. मात्र यामागील कारणं समजून घेणं आणि योग्य उपाययोजना करणं महत्त्वाच आहे.

C-section recovery
Heart damage symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय हळूहळू होतंय डॅमेज

शस्त्रक्रियेनंतर महिलांना पोट फुगण्याचा त्रास का होतो?

डॉ. सुकिर्ती जैन म्हणतात, “प्रसूती शस्त्रक्रिया ही एक मोठी शस्त्रक्रिया असून, त्यातून बरं होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. शस्त्रक्रियेनंतर अनेकदा भूल आणि वेदनाशामक औषधं दिली जातात. ही औषधं आतड्यांच्या सामान्य कार्यात तात्पुरता व्यत्यय आणू शकतात. जेव्हा चयापचय क्रिया मंदावते, तेव्हा अन्न आणि वायू सामान्यपणे पुढे सरकू शकत नाहीत. ज्यामुळे पोटात गॅस होतो, पोट फुगतं आणि जडपणा जाणवतो. शस्त्रक्रियेनंतर महिलांना पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.”

कमी शारीरिक हालचाल

डॉ. सुकीर्ती जैन यांच्या मते, "शस्त्रक्रियेनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये महिलांची शारीरिक हालचाल कमी होते आणि त्या बराच काळ विश्रांती घेतात. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि गॅस बाहेर पडणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच मी महिलांना शस्त्रक्रियेनंतर हलके चालण्याचा सल्ला देते, जेणेकरून पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल."

C-section recovery
Silent heart attack: शरीरात ही 4 लक्षणं दिसली तर समजा सायलेंट हार्ट अटॅक येणारे!

बद्धकोष्ठतेमुळे होणारा गॅस

डॉ. सुकीर्ती जैन म्हणतात, "शस्त्रक्रियेनंतर पोट फुगण्याचं एक प्रमुख कारण बद्धकोष्ठता असू शकते. अनेक महिला वेदनेमुळे शौचास जाणं टाळतात किंवा पुरेसं पाणी पीत नाहीत. यामुळे शौचास कडक होऊ शकतं ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास वाढू शकतो. ज्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांना पोट फुगण्याचा त्रास होणं सामान्य आहे."

शस्त्रक्रियेनंतर पोट फुगण्याची समस्या कशी टाळावी

  • दररोज हलके चाला चालण्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि पोटातील गॅस बाहेर टाकण्यास मदत होते

  • दररोज पुरेसे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो

  • फळं, भाज्या, ओटमील आणि संपूर्ण धान्य यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

  • दिवसाची सुरुवात जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाऊन करू नका.

  • दिवसा थंड पेयं, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा कोणतेही जड पदार्थ खाऊ नका.

C-section recovery
Heart Attack in Gym: जीममध्ये व्यायाम करताना ही ५ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com