Heart damage symptoms: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय हळूहळू होतंय डॅमेज

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक

हार्ट अटॅक म्हणजे केवळ अचानक छातीत दुखणं किंवा व्यक्ती कोसळणंही इतकंच चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण प्रत्यक्षात हृदयाशी संबंधित काही समस्या शरीरात अगदी शांतपणे वाढत असतात. अशावेळी हातांमध्ये दिसणारे काही बदलही तुमचं हृदय डॅमेज होत असल्याचा इशारा देत असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

heart disease signs

हातांमध्ये सूज येणं

हात, बोटं किंवा घोट्यांमध्ये सतत सूज दिसत असेल तर ते शरीरात द्रव साचण्याचं लक्षण असू शकतं. अशी समस्या अनेकदा हृदय डॅमेज होण्याशी संबंधित असते. रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यास शरीरात पाणी राहतं आणि सूज वाढू शकते.

swollen fingers

बोटांचा रंग निळसर होणं

हाताच्या किंवा पायाच्या बोटांचा रंग निळसर किंवा जांभळा दिसत असेल तर त्यामागे रक्तपुरवठा कमी झालेला असू शकतो. रक्तवाहिन्या अरुंद होणं किंवा हृदयातील इतर समस्यांमुळे असा बदल दिसू शकतो.

nail changes

नखांखाली लाल रेघा

नखांखाली लहान लाल किंवा तपकिरी रेघांसारखे डाग दिसत असतील, तर ते एंडोकार्डायटिस नावाच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. हा संसर्ग हृदयाच्या आतील अस्तरावर होतो आणि वेळेवर उपचार न झाल्यास गंभीर ठरू शकतो.

poor blood circulation

बोटांच्या टोकांचा आकार बदलणं

काही लोकांमध्ये बोटांची टोके मोठी दिसू लागतात आणि नखं खाली वाकल्यासारखी दिसतात. याला क्लबिंग म्हटलं जातं. रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यास अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

Osler nodes

बोटांवर वेदनादायक गाठी येणं

हाताच्या किंवा पायाच्या बोटांवर लालसर किंवा जांभळ्या रंगाच्या दुखणाऱ्या गाठी दिसत असतील तर त्यांना ओस्लर नोड्स म्हटलं जातं. हे देखील हृदयाच्या संसर्गाशी संबंधित संकेत मानले जातात.

finger clubbing

नखांचा रंग पांढरट होणं

काही लोकांच्या नखांचा बहुतांश भाग पांढरट दिसतो आणि टोकाजवळ लालसर किंवा जांभळा पट्टा दिसतो. या स्थितीला टेरीज नेल्स म्हटलं जातं. हे हार्ट अटॅक किंवा मधुमेहाशी संबंधित असू शकतं.

endocarditis symptoms

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा