

वाढतं वजन हा प्रश्न जवळपास सर्वांसमोर आहे. वजन म्हटलं की, बॉडी वेट आणि बीएमआयला खूप महत्त्व दिलं जात होतं. पण आता अनेक संशोधनांमधून वेगळंच चित्र समोर येतंय. शरीरात किती फॅट आहे यापेक्षा ते नेमकं कुठे साचतंय, हे अधिक महत्त्वाचं ठरतं. वजन काटा आपल्याला फक्त आकडा दाखवतो. मात्र शरीरात मसल्स जास्त आहेत की फॅट, किंवा फॅट आतील अवयवांभोवती जमा झालंय का, हे वजन काटा तु्म्हाला दाखवत नाही.
पोटाभोवती साचणाऱ्या चरबीला बेली फॅट असं म्हटलं जातं. ही चरबी हृदयाच्या आजारांचा धोका वाढवू शकते. विशेष म्हणजे काही लोकांचं वजन नॉर्मल दिसत असलं तरी त्यांच्या पोटावर फॅट साचलेलं असू शकतं.
शरीरात साचणाऱ्या सगळ्या प्रकारच्या चरबीचा परिणाम सारखा नसतो. नितंब आणि मांड्यांभोवती साचलेली चरबी तुलनेने कमी धोकादायक मानली जाते. पण पोटाच्या आत, लिव्हर, पॅन्क्रियाज आणि आतड्यांच्या आसपास साचणारी चरबी मात्र अधिक धोकादायत ठरते.
हे फॅट शरीरात केमिकल्स तयार करतं. याचा परिणाम इन्सुलिनच्या कार्यावर होतो. ब्लड प्रेशर वाढतं आणि कोलेस्ट्रॉलचं संतुलनही बिघडू शकतं. तज्ज्ञांच्या मते, हृदयाच्या आरोग्यासाठी केवळ वजनाकडे पाहून चालत नाही तर शरीरात फॅट कसं आणि कुठे साचतंय हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. पोटाभोवती वाढणारी चरबी हृदयविकाराचा झटका आणि कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका वाढवते.
भारतामध्ये ही समस्या आणखी गंभीर स्वरूपात पाहायला मिळते. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, अनेक भारतीयांचं वजन सामान्य असलं तरी त्यांचा पोटाचा घेर वाढलेला आढळला. त्याचबरोबर ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरही जास्त असल्याचं पाहायला मिळालंय. या स्थितीला 'नॉर्मल वेट ओबेसिटी' किंवा 'मेटाबॉलिक ओबेसिटी' असं म्हटलं जातं. याचा म्हणजे व्यक्ती बाहेरून सडपातळ दिसत असली तरी शरीराच्या आत साचलेली चरबी आरोग्यासाठी घातक असते.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, भारतीयांसाठी पोटाचा घेर हा महत्त्वाचा संकेत मानला जातो. पुरुषांची कंबर 90 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि महिलांची 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असणं योग्य मानलं जातं.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी झटपट वजन कमी करणारे उपाय किंवा क्रॅश डाएट उपयोगी ठरत नाहीत. अशा पद्धतींमुळे मसल्सही कमी होऊ शकतात. त्याऐवजी नियमित व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग, प्रोटीनयुक्त आहार, कमी प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट, पुरेशी झोप आणि ताण नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.