Joint Pain: वय ३० पण सांधेदुखी ६० सारखी? तरुण वयात हाडांचे आजार का वाढतायत? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Osteoarthritis : सध्याच्या जीवनशैलीत लोक बसून काम करणं पसंत करतात. पण त्यांच्या या कामाचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आणि कमी वयातच त्यांना सांधेदुखी सारख्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
Early Osteoarthritis on the Rise Among Young Adults
osteoarthritisgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच म्हातारपणातल्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आता अनेकांना हालचाल करायला आवडत नाही. लोक दिवस दिवसभर एका जागी बसून कामं करतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुम्हाला तिशीतच साठीच्या समस्येला म्हणजेच सांधेदुखीच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

बऱ्याचदा लोक आठवडाभर व्यायाम करणं टाळतात आणि विकेंडलाच भरपूर कठीण वर्कआउट करतात. हे नवं फिटनेस कल्चर झालंय असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळेही तुम्हाला सांधुदुखीच्या समस्येला सामोरं जावं लागतं.

Early Osteoarthritis on the Rise Among Young Adults
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; या राज्यात महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

तुम्ही जशी लाइफस्टाइल जगता, तसं तुमचं शरीर कार्य करतं. जर चुकीच्या सवयी, कमी झोप, उशीरा झोप, व्यायाम नाही, शरीराची हालचाल नाही, वजन वाढत चाललं असेल तर तुम्ही या सवयींमध्ये वेळीच बदल करणं खूप गरजेचं आहे. ही माहिती 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स' मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमधील आहे.

Early Osteoarthritis on the Rise Among Young Adults
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा 23वा हप्ता लवकरच खात्यात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार वितरण

तसेच त्यांनी रिपोर्टमध्ये नमुद केल्यानुसार जगभरात ५० कोटींहून जास्त लोक ऑस्टिओआर्थरायटिसने (OA) म्हणजेच सांधेदुखीने वैतागलेले आहेत. त्यांची संख्या ७.६ टक्के आहे. 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज'च्या अंदाजानुसार, गेल्या ३० वर्षांत या आजाराचं प्रमाण १३२ टक्क्यांनी वाढलंय. आता २०५० पर्यंत त्यात आणखी ६० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

आता संधीवाताचा त्रास नेमका कशामुळे सुरु होतो आणि तो तरुणांनाच जास्त का होतोय? हे समजण्यासाठी दोन उदाहरणं पाहून कारणं समजून घेऊयात.

पहिलं उदाहरण

३३ वर्षाच्या आयटी व्यावसायिकाला गुडघेदुखीचा त्रास होत होता. मग त्याने तपासणी केली. त्यात त्याच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता, वाढलेला बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि सांध्यांची झीज झालेली दिसली. मग त्याने योग्य उपचार, वजन नियंत्रण, पौष्टीक आहार आणि व्यायामामुळे त्याची तब्बेत सुधारली.

दुसरं उदाहरण

६० वर्षाच्या महिलेला गुडघ्यात खूप दुखायचं आणि झोपही येत नव्हती. साधी औषधं घेऊन तिला आराम आला नाही. म्हणून तिने तपासणी केली. त्यामध्ये Hypersensitivity ची समस्या आढळली. त्यानंतर तिला स्पेशल उपचार घ्यावे लागले मग तिला मोठा आराम मिळाला.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Early Osteoarthritis on the Rise Among Young Adults
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ...तर eKYC पुन्हा सुरू करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com