

हिवाळ्यात अनेकांना शूज घालण्याची हौस असते. त्यात आजकाल व्हाइट शूज घालण्याची क्रेझ वाढली आहे. व्हाइट शूजमुळे लुकमध्ये वाढ होते. पण हे शूज लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते.
व्हाइट शूजवर काळे डाग आणि घाण सहज साचते. साफ करता आपल्या नाकी नऊ येतात. त्यामुळे शूज घाण दिसतात. शूजवरील घाण सहज साफ होत असले तरी तेलाचे डाग किंवा काळे डाग सहज जात नाही. पण काही सोप्या टीप्स वापरल्या तर मिनिटात स्वच्छ होतील. व्हाइट शूज स्वच्छ करण्यासाठी कोणत्या तीन गोष्टींचा वापर करावा जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा स्वयंपाकघरात (Kitchen) उपयोगी पडत नाही तर शूज साफ करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पाणी आणि बेकिंग सोड्याची पेस्ट तयार करुन शूजवर लावा. ५ ते ६ तासानंतर शूज स्वच्छ पुसून घ्या. शूज काही मिनिटात नव्यासारखे चमकतील.
2. व्हिनेगर
व्हिनेगरच्या मदतीने व्हाइट शूज स्वच्छ करु शकता. यासाठी बादलीत व्हिनेगर घालून त्यात कोमट पाणी घाला. त्या पाण्यात (Water) काही वेळ शूज भिजत ठेवा. काही वेळाने शूज पुन्हा नव्यासारखे होतील.
3. टूथपेस्ट
व्हाइट शूजवरील डाग सहसा निघत नाही. अशावेळी टूथपेस्टचा वापर करु शकता. टूथपेस्टच्या मदतीने तुम्ही शूजवरील डाग सहज काढू शकता. ब्रशवर टूथपेस्ट घेऊन शूजवरील डागावर लावा आणि घासा. शूज स्वच्छ (Clean) होण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.