White Hair Tips : सफेद केस होतील महिन्याभरात गायब; केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी नियमित खा हे सूपरफूड
White Hair Superfood :
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे आरोग्यासोबत केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे कमी वयात केस अकाली पिकू लागले आहेत.
केस पांढरे दिसू लागले की, आपण म्हातारे झालो असा संभ्रम अनेकांच्या मनात दिसून येतो. केस पांढरे होणे, सतत गळणे, कोंडा आणि केसांच्या इतर अनेक समस्यांवर उपाय करुनच पाहिले असतील. तसेच केसांसाठी आपण अनेक रासायनिक उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे केसांचा पोत खराब होतो. परंतु, जर केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही आहारात काही सूपरफूडचा समावेश केल्यास पांढरे केस महिन्याभरात काळे होतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. अंडी
अंड्यांमध्ये (Eggs) प्रथिने भरपूर असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ देखील चांगल्या प्रमाणात असते. ज्याच्या कमतरतेमुळे केस काळे होण्यास मदत होऊ शकते.
2. काळे तीळ
काळे तीळ हे पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. यामध्ये लोह आणि तांबे यांचे विशेष प्रमाण असते जे केसांचा रंग बदलण्यास मदत करते. काळ्या तीळाचा आहारात समावेश केल्यास केस अकाली पांढरे होणे दूर होऊ शकते.
3. कढीपत्ता
अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध कढीपत्ता हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात व्हिटॅमिन (Vitamins) बीसह अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात. कढीपत्त्याचे सेवन केल्यास केस कमी प्रमाणात काळे होतात.
4. बदाम
बायोटिन समृद्ध बदाम केसांचा काळा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात. बदाम केसांना व्हिटॅमिन ई देखील देतात, ज्यामुळे केसांचा पोत सुधारतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.