Beauty Tips For Oily Skin: अनेकांना चेहरा सतत धुण्याची सवय असते त्यामुळे त्यांना असे वाटते की, चेहऱ्याचे सौंदर्य अधिक सुंदर होत जाते. परंतु, कितीही महागडे उत्पादने चेहऱ्याला लावली तरी त्वचा सतत तेल सोडते त्यामुळे बरेच जण वैतागतात. पण चेहऱ्याची योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यात या तेलकट त्वचेचा सामना अधिक प्रमाणात करावा लागतो.
1. टिप्स
तेलकट (Oil) त्वचेसाठी, हलके, नॉन-कॉमेडोजेनिक, जेल-आधारित मॉइश्चरायझर वापरावे कारण ते त्वचेवर अतिरिक्त तेल जमा करत नाही आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. ज्यामध्ये, नियासीनामाइड सीरम हे सेबम नियंत्रणासाठी फायदेशीर आहे.
यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या तर दूर होतातच, पण ते लावल्याने पिंपल्सचा धोकाही कमी होतो.
2. नाईट क्रीम
तेलकट त्वचेच्या लोकांनी नाईट क्रीममध्ये कोणत्याही रासायनिक उत्पादनाऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा.
यासाठी एलोवेरा जेल आणि कच्चे दूध एकत्र करून नाईट क्रीम बनवता येते. त्याच वेळी, गुलाब पाणी नाईट क्रीम म्हणून देखील लावता येते.
तेलकट त्वचेवर लिंबाचा रस, हळद आणि ग्लिसरीन लावू नका. यामुळे चेहऱ्यावर तेलाचे प्रमाण वाढू शकते.
3. काय टाळावे
तेलकट त्वचेच्या लोकांनी मॉइश्चरायझर म्हणून पेट्रोलियम जेली, लॅनोलिन सारखी उत्पादने टाळावीत.
Hyaluronic acid आणि kaolin हे तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
वृद्धत्वविरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉइश्चरायझर्समधील ऍडिटीव्ह्सचा वापर केला जाऊ शकतो.
अँटिऑक्सिडंट्स आणि एसपीएफ असलेले मॉइश्चरायझर दिवसा वापरले जाऊ शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.