Ashadha Amavasya 2025 : घरातील आजारपणं, पैशाची चणचण दूर करण्यासाठी आषाढ अमावस्येला करा हे प्रभावी उपाय

Money Problems Remedies : २४ जून २०२५ रोजी आषाढ अमावस्या असून ही तिथी पितृकार्य, आजारपण व आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी पिंपळ पूजन, तर्पण, श्राद्ध व दान केल्याने पुण्य लाभते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते.
ASHADHA AMAVASYA 2025 REMEDIES FOR HEALTH, MONEY AND PITRU DOSH
Ashadha Amavasya 2025 google
Published On

आषाढ अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा दिवस पितृंची कृपा मिळवण्यासाठी योग्य मानला जातो. या अमावस्येला केलेले उपाय अनेक अडीचणींपासून तुम्हाला लांब ठेवू शकतात. तसेच घरातील आजारपणं किंवा पैशाची चणचण दूर करण्यासाठी हा दिवस फायदेशीर ठरतो. पौराणिक चालीरितींनुसार या दिवशी पुण्य मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

ASHADHA AMAVASYA 2025 REMEDIES FOR HEALTH, MONEY AND PITRU DOSH
Love Story : परदेशी महिलेशी लग्न करणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण?

आषाढ अमावस्या तारिख आणि वेळ

आषाढ अमावस्या येत्या २४ जून २०२५ रोजी आहे. या दिवशी संध्याकाळी ७ वाजता अमावस्या सुरु होणार आहे. तर शेवट २५ जून रोजी दुपारी ४.०२ वाजता संपणार आहे. म्हणजेच २५ जूनला बुधवारी अमावस्या साजरी केली जाणार आहे. तुम्ही या दिवशी पितृ कर्माशी संबधित कामे करू शकता. यावेळी कामे देवाची कृपा मिळवण्यासाठी तसेच पुर्वज्यांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील.

श्राद्ध अर्पण

आषाढ अमावस्या तिथी पितृकार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी घरी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितृदोश कमी होतो. तसेच पूर्वजांच्या आत्माला शांती मिळण्यासाठी तुम्ही पाणी अर्पण करू शकता. त्याने घरामध्ये शांती नांदते. वाद टाळले जातात.

पिंपळाच्या झाडाची पूजा

आषाढ अमावस्येला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तसेच झाडाला पाणी अर्पण करून पुजा करावी. असे केल्याने आयुष्यात पुण्य मिळेल. तसेच घरात नकारात्मकता, आजारपणं, वाद, तंटा दूर होईल.

दान आणि उपवास

आषाढ अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर उठून स्नान करणे पुण्याचे ठरेल. फक्त पाण्यात गंगाजल असावे. त्यानंतर तीळ, कपडे, जेवण, पैसे अशा गोष्टी दान कराव्यात. याने घरातील आर्थिक तंगी दूर होते आणि रोग, कर्ज, दारिद्यापासून मुक्ती मिळते.

ASHADHA AMAVASYA 2025 REMEDIES FOR HEALTH, MONEY AND PITRU DOSH
Mumbai Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? मुंबईतच करा पावसाळ्यातली धमाल या Hidden स्पॉट्समध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com