Gum digestion facts: च्युइंग गम चुकून गिळल्यावर शरीरात नेमकं काय घडतं? पोटोत किती काळ राहत वाचा

chewing gum swallowed: च्युइंग गम चुकून गिळल्यास तो पोटात वर्षानुवर्षे राहत नाही. शरीर ते पचवू शकत नसले तरी शेवटी शौचावाटे बाहेर टाकलं जातं. मात्र वारंवार गिळल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही सवय टाळणं गरजेचं आहे.
chewing gum swallowed
chewing gum swallowedsaam tv
Published On

च्युइंग गम खायची सवय अनेकांना असते...तुम्हीही च्युइंग गम खात असाल. मात्र तुमच्यासोबत कधी असं झालंय का की च्युइंग गम खाताना तुम्ही ते चुकून गिळलत. च्युइंग गम चुकून गिळलं की काही जण फारच घाबरतात. तुम्ही कधी विचार केलाय का की च्युइंग गम गिळल्यानंतर काय होत असेल? आज आपण या आर्टिकलमधून ते जाणून घेऊया.

सामान्यतः एखाद्या वेळी गम गिळलं तर त्यातून कोणताही मोठा धोका नसतो. शरीराची पचनक्रियेच्या माध्यमातून ते शरीराबाहेर टाकलं जातं. पण ही सवय वारंवार झाली तर मात्र समस्या वाढू शकतात. सतत गम गिळल्यामुळे पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता वाढते.

chewing gum swallowed
Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

गम चघळताना ते खूप चिकट असतं. त्यामुळे ते बराच वेळ तोंडात टिकतं. पण गिळल्यानंतर त्याचा पोत बदलत नाही. हीच गोष्ट कधी कधी पोटात अडचण निर्माण करू शकते. गम पोटाच्या भिंतींना चिकटून राहू शकतं आणि त्यामुळे आतड्यांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. आपलं शरीर हे गम पचवू शकत नाही.

किती काळ पोटात राहचं च्युइंग गम?

तु्म्ही ऐकलं असेल की, च्युइंग गम गिळलं तर ते तब्बल सात वर्ष पोटात राहतं. मात्र हा एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात च्युइंग गम इतका काळ शरीरात राहत नाही. पचनसंस्थेतील इतर घटक काही प्रमाणात त्याचे तुकडे करतात. पण त्याचं तुमच्या शरीरात पूर्णपणे पचन होऊ शकत नाही.

chewing gum swallowed
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

अशा न पचणाऱ्या पदार्थांप्रमाणेच गमही शेवटी शौचावाटे शरीराबाहेर टाकलं जातं. मात्र काही कारणांमुळे ते आतड्यांमध्ये अडकून राहिलं, तर ब्लॉकेज होण्याचा धोका निर्माण होतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

chewing gum swallowed
Lung cancer: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा फुफ्फुसांचा कॅन्सर झालाय; काय आहेत लक्षणं वाचा

च्युइंग गम पोटात अडकलं तर?

दीर्घकाळ च्युइंग गम पोटात अडकून राहिल्यास मळमळ, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हा त्रास फक्त लहान मुलांना नाही तर मोठ्यांनाही होऊ शकतो. त्यामुळे च्युइंग गम खाण्याची जास्त सवय असेल तर ती कमी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com