३ महिन्यात १० किलो वजन कमी होईल; जाणून घ्या ७ टिप्स
Weight Loss TipsSaam Tv

Weight loss tips : ३ महिन्यात १० किलो वजन कमी होईल; फॉलो करा ७ टिप्स

weight loss tips in Marathi : मेहनत केल्याविना हाती काहीच फळ लागत नाही. वजन कमी करण्यासाठी थोडी फार मेहनत करावी लागते. तीन महिन्यात तुम्ही १० किलो वजन कमी करू शकता.
Published on

मुंबई : अनेक जाड व्यक्तींना त्यांच्या वाढत्या वजनाची फार काळजी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक जण डाएटचाही पर्याय स्वीकारतात. मात्र, डाएटचं पालन व्यवस्थित करू शकत नाही. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ७ टिप्स फॉलो करू शकता. टिप्स फॉलो करून तीन महिन्यात १० किलो वजन कमी करू शकता.

तळलेले पदार्थ आणि बंद पाकिटातील पदार्थांपासून दूर राहा

वजन कमी करण्यासाठी तळलेल्या पदार्थांपासून दूर राहावं लागेल. तसेच घरातील बंद पाकिटातील वेफर, चिवडा खाणे बंद केले पाहिजे. चॉकलेट आणि मिठाई खाणे देखील टाळले पाहिजे. मैद्याने तयार केलेले पदार्थ खाणे टाळावे.

३ महिन्यात १० किलो वजन कमी होईल; जाणून घ्या ७ टिप्स
Weight Loss Tips : उन्हाळ्यात वजन कमी करायचय? आहारात करा 'या' फळांचा समावेश

आहारात प्रथिनांचं समावेश करा

वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये प्रथिनांचा समावेश करा. दिवसभरातील आहारात प्रथिनांचा समावेश करा. नाश्त्यामध्ये पोहे किंवा ऑमलेटचा समावेश करू शकता. दुपारच्या जेवणात चिकन, अंडी आणि दही खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात दाळ, चिकन, अंडी खाऊ शकता.

चालणे

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. सॅलाडचा आहारात समावेश करा. त्यात फायबरचा अधिक असते. फायबरमुळे पोट अधिक वेळ भरलेले राहते.

खूप पाणी प्या

शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. दिवसभरात ३ ते ४ लीटर पाणी पिऊ शकता.

चांगली झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे असते. झोप घेण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये. झोपण्यापूर्वी ४ तास आधी चहा आणि कॉफी पिऊ शकता. चांगली झोप घेण्यासाठी घरात अंधार ठेवला पाहिजे.

३ महिन्यात १० किलो वजन कमी होईल; जाणून घ्या ७ टिप्स
Amla Benefits in Marathi : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

दारुचे सेवन करण्यापासून दूर राहा

दारू आणि धूम्रपान करणे यापासून ३ महिने दूर राहा. दारूमुळे वजन वाढते. तसेच अन्य आजारांची देखील भर पडते. दारुच्या व्यसनामुळे भूक वाढते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com