Siddhi Hande
अनेकजण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात.वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात या हेल्दी ज्युसचा समावेश करा.
रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने वजन कमी होते.
लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट आणि डिटॉक्स राहते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. त्यामुळे मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
बीटरुटचा ज्युस प्यायल्याने शरीरातील वाईट घटक नाहीसे होते. बीटरुटमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पचनशक्ती सुरळीत काम करते.
ग्रीन टी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया वाढते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रोज सकाळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.