Women Shopping: दर आठवड्याला नवे कपडे खरेदी करणाऱ्या महिलांचा ताणतणाव होतो दूर, आनंदातही होते वाढ, आश्चर्यचकित करणारं संशोधन

Stress Relief: नवीन संशोधनानुसार महिलांनी आठवड्यातून एकदा नवे कपडे खरेदी केल्याने ताणतणाव कमी होतो आणि आनंद वाढतो. शॉपिंगमुळे मेंदूमध्ये डोपामाइन वाढून मनःस्थिती सुधारते आणि आत्मविश्वासही वाढतो.
Stress Relief
Women Shoppinggoogle
Published On

महिलांना शॉपिंग करायची ईच्छा नेहमीच असते. कामाच्या धावपळीत, घरच्या कामांमधून महिला वेळ काढून शॉपिंगला जात असतात. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यातच अलिकडील एका संशोधनात महिलांच्या शॉपिंगबद्दलचे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. पुढे आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

नुकत्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या पैकी एक पोस्ट म्हणजे, महिलांनी आठवड्यातून किमान एकदा नवे कपडे खरेदी केल्याने महिलांचा ताण कमी होतो. तसेच त्यांच्या आनंदही दुप्पट होतो. कपाटात नवे कपड्यांचे ढीग असणे ही फक्त फॅशनची गोष्ट नसून आत्मविश्वास वाढवणारी आणि मनःस्थिती सुधारवणारी एक भावनिक रिफ्रेशमेंट आहे.

Stress Relief
kadipatta chutney: कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी; चव आणि आरोग्य दोन्हींसाठी फायदेशीर

संशोधकांच्या मते, ऑनलाइन असो किंवा शॉपिंग मॉलमध्ये, खरेदीचा अनुभव मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम अॅक्टीव्ह करतो. यावेळी स्त्रियांमध्ये डोपामाइनसारख्या आनंददायी रसायनांची निर्मिती होते आणि त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते.

युनिव्हर्सिटी ऑफ हर्टफोर्डशायर आणि Psychology Today यांनी प्रसिद्ध केलेल्या या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, नियमितपणे नवे कपडे घेणाऱ्या महिलांचे मनोबल अधिक मजबूत होते. अनेक सहभागींनी सांगितले की आवडते कपडे खरेदी केल्याने त्यांना त्वरित समाधान मिळतं, स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते आणि विशेषत: स्ट्रेसमध्ये गेलेला आठवडा शॉपिंगने डोकं खूप शांत होतं. संशोधकांचे म्हणणे आहे की, आर्थिक शिस्त महत्त्वाची असली तरी छोट्या गोष्टींसाठी स्वतःला ट्रीट देणे मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.

या अभ्यासाचा संदेश स्पष्ट आहे की, हे फक्त लास्टाईलबद्दल नाही, तर आपण घालतो त्या कपड्यांमुळे मन हलके व आनंदी होण्याचा लाभदेखील आहे. अधूनमधून स्वतःसाठी खरेदी करणे हा केवळ छंद नसून एक सकारात्मक वेलनेस सवयही ठरू शकते.

Stress Relief
Bad Cholesterol Food: नसांना चिकटलेला घाणेरडा कोलेस्ट्रेरॉल बाहेर करण्यासाठी हे ४ पदार्थ नक्की खा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com