Walking Health Benefits: चालाल तर वाचाल! रोज फक्त ३० मिनिटे चाला, आयुष्यात होतील मोठे बदल, स्वतःवर विश्वासही बसणार नाही

Heart Health Exercise Time: दररोज फक्त ३० मिनिटे चालण्याची सवय हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते, मधुमेह व उच्च रक्तदाबाचा धोका कमी करते आणि मानसिक ताण दूर करून दीर्घायुष्य वाढवते.
Heart Health Exercise Time
Walking Health Benefitsgoogle
Published On

सध्या कामाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. पुर्वी लोक ओझ्याचं काम करायचे पण आता एका जागी बसून होतं. बदलत्या युगाप्रमाणे आपल्याकडे प्रगत माध्यमे सुद्धा आली. त्याने अनेकांना घरबसल्या काम करता आलं. त्यात कोविडच्या काळात अनेकांनी घरीबसून काम केलं. पण ही सवय अनेकदा सोयीची असली तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा वेगळा परिणाम जाणवू लागला आहे.

लोक आता पुर्वी सारखे सलग चालत नाहीत. फिटनेस हा त्यांच्या आवडीचा विषय असला तरी त्याची बेसिक सुरुवात म्हणजे सलग चालणं हेही अनेकांना जमत नाही. पण एका बेसिक चालण्याच्या सवयीने तुमच्या आरोग्यात खूप मोठे चमत्कारी बदल होऊ शकतात. जसे की, रक्ताभिसरण सुधारतं, खराब कोलेस्ट्रेरॉल कमी होतं, ह्रदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते आणि तुमच्या शरीरातला फॅट हा नॅचरली कमी होतो. ही एक साधी सोपी सवय तुमच्या आयुष्यात खूप मोठे आणि चांगले बदल आणू शकते. तसेच हार्ट अटॅकसारख्या समस्याही याने दूर होतात.

Heart Health Exercise Time
Blood Pressure: BP च्या गोळ्या घेताना ही चूक करत नाहीत ना? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

पुण्यातील Metro City Heart Institute येथील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन वर्मा यांच्या मते, रोज दिवसाला फक्त ३० मिनिटे तुम्ही सलग चालण्याची सवय केली पाहिजे. याने हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसून येतो. तसेच चालल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका सुद्धा कमी होतो. कॅलरी बर्न होऊन चयापचय क्रिया सुधारते, त्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळतं. मानसिक आरोग्यासाठीही चालणं अत्यंत फायदेशीर आहे.

रोजच्या शारीरिक हालचालीमुळे एंडॉर्फिन्स स्रवतात, जे ताण, चिंता आणि नैराश्याची लक्षणं कमी करतात. संशोधनानुसार, नियमित चालण्यामुळे वयोमानानुसार होणारी स्मरणशक्ती कमी होण्याची प्रक्रिया मंदावते आणि डिमेन्शियाचा धोका कमी होऊ शकतो. जलद गतीने चालल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीरातील ऑक्सिजन पुरवठा सुधारतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे चालाल तर वाचाल हे सुत्र नेहमी लक्षात ठेवा.

Heart Health Exercise Time
Blood Pressure: BP च्या गोळ्या घेताना ही चूक करत नाहीत ना? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com