

सध्याची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आणि पदार्थांमध्ये बदल झाले आहेत. काहींच्या झोपेच्या वेळेत, कामाच्या वेळेत बदल झाले आहेत. माणूस त्याच्या वाढत्या वयासोबत त्याच्या सवयींमध्येही बदल करत असतो. पण हे बदल चांगले आहेत का? हा प्रश्न अनेकांना असतो. तुम्ही यासाठी तुमच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे. कारण तुमच्या शरीरासाठी ऊर्जा, मेंदूचं कार्य आणि मज्जासंस्थेच्या कार्य जर नीट असेल तरच तुम्ही इतर कामं करु शकता. यासगळ्या साठीच आवश्यक असतं व्हिटॅमिन B12.
काही व्यक्तींना डॉक्टरांना सहज सांगतात, तुमच्यात व्हिटॅमिन B12 ची कमतरता आहे. मग त्यांच्या सल्ल्याने ते औषधंही देतात. ती औषधं वेगवेगळ्या प्रकारात असतात. जसे की, मल्टिव्हिटॅमिन, इंजेक्शन किंवा गोळ्या इ. पण काही लोक मेडिकलमध्ये मिळणाऱ्या किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोळ्या घेतात, आणि त्याचा परिणाम त्यांच्या नकळत त्यांच्या किडनीवर होतो.
तुमच्या शरीरातली ही अत्यंत महत्वाची आणि तुमचं शरीर फिल्टर करणारा अवयव मानला जातो. त्याने शरीरातली घाण बाहेर निघून जाते आणि किडनी सुरक्षितपणे काम करते. पण तुम्ही जर कोणत्याही गोळ्या जास्त घेत असाल तर तीच्या कार्यात बिघाड होतो.
कॅनडामध्ये करण्यात आलेल्या आणि JAMA मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मधुमेहामुळे किडनीचा आजार असलेल्या रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. या संशोधनात काही रुग्णांना व्हिटॅमिन B12 आणि B6 चे जास्त डोस देण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे, ज्यांनी हे उच्च डोस घेतले त्यांच्या किडनीची कार्यक्षमता प्लेसिबो घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त वेगाने कमी होत असल्याचं दिसून आलं.
याचा अर्थ असा नाही की व्हिटॅमिन B12 सर्वांसाठी हानिकारक आहे. उलट, शरीरात B12 ची कमतरता असल्यास ते आवश्यक प्रमाणात घेणं गरजेचं असतं. पण ज्यांना आधीपासून किडनीचे आजार आहेत, मधुमेह आहे किंवा इतर औषधे चालू आहेत त्यांनी सप्लिमेंट घेण्यापूर्वी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण अनेक औषधांमुळे शरीरात व्हिटॅमिन B12 चं शोषण बदलू शकतं. तसेच काही वेळा व्हिटॅमिन B12 इतर व्हिटॅमिन्स किंवा औषधांसोबत घेतल्यास त्याचा परिणाम बदलू शकतो. उदाहरणार्थ, जास्त प्रमाणात घेतलेलं व्हिटॅमिन C हे B12 च्या शोषणात अडथळा आणू शकतं. त्यामुळे अनेक सप्लिमेंट्स एकत्र घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
टीप : औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुरू किंवा बंद करू नयेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.