Vat Purnima 2024 Muhurt: वट पोर्णिमेला महिला व्रत का करतात? जाणून घ्या पूजेचा शूभ मुहूर्त

Vat Savitri Vrat Importance: यंदा २१ जून रोजी वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपोर्णिमेला पूजा करण्याचा शूभ मूहूर्त कधी ते जाणून घ्या.
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 Saam TV

२१ जून रोजी संपूर्ण राज्यात वटपोर्णिमा साजरी केली जाणार आहे. वटपोर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील सण आहे. यादिवशी पत्नी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, भरभराटीसाठी व्रत करतात. सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा, अशी प्रार्थना करतात. वटपोर्णिमेच्या बायको आपल्या नवऱ्यासाठी व्रत करते. हिंदू धर्मात वट सावित्री व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

वैदिक दिनदर्शिकेनुसार, हे व्रत दरवर्षी अमावस्या आणि ज्येष्ठ महिन्याच्या पोर्णिमेला केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि वटवृक्षाची पूजा केली जाते. असे केल्याने आपल्याला संसारात सुख- समानधान मिळते. पतीच्या दिर्घायुष्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. यावर्षी वट पोर्णिमा कधी आहे? वट पोर्णिमेचे व्रत करण्याचा शूभ मूहूर्त कधी? हे जाणून घेऊया.

Vat Purnima 2024
Morning Yoga: सकाळी करा ही 5 योगासने, दिवसभर राहाल एनर्जेटिक

वैदिक दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ शुक्ल पक्षाची पोर्णिमा २१ जून रोजी सकाळी ७.३१ मिनिटांनी सुरु होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी सकाळी ६.३७ मिनिटांनी समाप्त होईल. या मूहूर्तावर वटसावित्रीची पूजा केली जाते. म्हणजेच २१ जून २०२४ रोजी महिला वटवृक्षाची पूजा करावी, २१ जून रोजी महिलांनी उपवास करावा. याशिवाय २१ जून रोजी ज्येष्ठ पोर्णिमा व्रतदेखील पाळण्यात येणार आहे. या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तयार होत असल्याचे पंचांगात सांगितले आहे. शुभ योग संध्याकाळी ६.४० मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर शुक्ल योग सुरु होईल.

Vat Purnima 2024
Health Tips: आरोग्याची काळजी घ्या! पावसाळ्यात मूत्रसंसर्गामध्ये वाढ, डॉक्टरांनी दिला सल्ला

वट सावित्रीचे व्रत महाराष्ट्र, गुजरात, दक्षिण भारतात ज्येष्ठ पोर्णिमेच्या दिवशी केले जाते. वटपोर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्षाची पूजा करताना पाच फळे नैवद्य ठेवायचा असतो. वट सावित्रीचे व्रत केल्याने संसारात सुख-समृद्धी प्राप्त होते. वटवृक्षात त्रिमूर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश राहतात, असे मानले जाते. त्यामुळेच हिंदू धर्मात वटवृक्षाची पूजा केली जाते.

टीप- वरील माहिती गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Vat Purnima 2024
Pimple Free Skin: चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी दालचिनीचा 'हा' फेसपॅक नक्की लावा; चेहरा होईल तजेलदार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com