Vastu Tips: नवीन वर्षात तुळशीशी संबंधित 'हे' उपाय करा, घरात पडेल पैशांचा पाऊस !

वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
Vastu Tips
Vastu Tips Saam Tv

Vastu Tips : तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण चहामध्ये तुळशीची पाने घालून पितात. याशिवाय तुळशीचा अर्क रोगांशी लढण्यास मदत करतो.

तुळशीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. वास्तुशास्त्रात तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ज्योतिष्यशास्त्रानुसार, या वनस्पतीशी संबंधित काही उपाय तुम्हाला येत्या वर्षात श्रीमंत बनवतील आणि तुम्हाला गरीबीचा सामना करावा लागणार नाही. जाणून घेऊया त्याबद्दल

Vastu Tips
Horoscope 2023 : येणाऱ्या 2023 च्या वर्षात चमकेल 'या' 5 राशींचे भविष्य, अपूर्ण स्वप्न देखील होतील पूर्ण !

पैशाची कमतरता अशा प्रकारे दूर होईल

1. नवीन वर्षाच्या सुरुवातीस आता फक्त काही दिवस उरले आहेत. 2022 हे वर्ष अनेक लोकांसाठी मोठ्या संकटात गेले आहे. या वर्षी बहुतेक लोकांना कोरोनाचा फटका बसला आणि गरिबीचा सामना करावा लागला. ज्योतिष्यशास्त्रानुसार, येत्या वर्षात तुळशी तुम्हाला गरिबीपासून दूर ठेवेल. तुम्हाला फक्त शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीमंजरी अर्पण करायची आहे. यामुळे धनदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील.

2. आपल्या घरात (Home) नेहमी सुख-शांतीचे वातावरण असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी तुम्हाला कोणताही शुभ दिवस पाहून तुळशीमंजरी गंगाजलात टाकून हे पवित्र पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि घरातील कलह संपेल.

3. जर तुम्ही मुलांच्या (Child) सुखापासून वंचित असाल आणि वैवाहिक जीवनातील आनंद संपला असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिवलिंगाला तुळशीमंजरी मिश्रित दूध अर्पण करा. यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद परत येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com