Vastu Tips
Vastu TipsSaam Tv

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना हे नियम लक्षात ठेवाच! होईल प्रगती, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips For House : वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो.
Published on

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो.

वास्तुशास्त्रात दिशेला अधिक महत्त्व आहे. घरातील सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपण दिशेसोबत काही नियम देखील लक्षात ठेवायला हवे. ज्यामुळे आयुष्यात सतत प्रगती होईल. तसेच सुख-समृद्धी नांदेल. जर तुम्ही देखील वास्तुचे काही नियम लक्षात घेऊन घर बांधले तर अनेक अडथळ्यांपासून दूर राहाल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. शौचालय

घरात शौचालय आणि स्नानगृह वेगवेगळ्या ठिकाणी असायला हवे. वास्तुशास्त्रानुसार ईशान कोन्यात कधीही शौचालय बांधू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता येते. शौचालयासाठी योग्य दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात असायला हवे.

Vastu Tips
Vastu Tips : स्वयंपाकघरातून आजच फेकून द्या या गोष्टी, अन्यथा लक्ष्मी देवी होईल नाराज, करावा लागेल दारिद्रयाचा सामना

2. स्नानगृह

स्नानगृह घरातील सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण. याची सर्वात योग्य जागा पूर्व दिशा आहे. निचरा (पाईप) ईशान्य दिशेला असायला हवा. तर गिझरची दिशा दक्षिण-पूर्वेला असायला हवी.

3. स्टोअर रुम (Room)

खाद्यपदार्थ (Food) आणि इतर वस्तू ईशानमध्ये म्हणजेच उत्तर आणि पूर्व दरम्यान साठवले पाहिजे. साठवण ही जास्त काळही नसायला हवी. पैशांची बचत करण्यासाठी उत्तर दिशा ही अधिक महत्त्वाची मानली जाते.

Vastu Tips
Car Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर; घरात नांदेल सुख-समृद्धी

4. स्टडी रुम

स्टडी रुम हा नेहमी दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेच्या मध्यभागी असायला हवी. त्यामुळे मुलांचे (Kids) अभ्यास लक्ष लागते. तसेच उत्तर दिशा देखील चांगली मानली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com