Melasma Treatment : चेहऱ्यावरचे वांग घालवायचंय? स्वयंपाकघरातल्या या ४ पदार्थांचा करा वापर, आठवड्याभरातच दिसेल फरक

Dark Spots On Face : चेहऱ्यावरचे वांग आणि काळे डाग कशामुळे येतात? याचं कारण जाणून घेऊन त्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे.
Dark Spots On Face
Dark Spots On FaceSaam tv
Published On: 

महिलेसाठी तिचं सौंदर्य खूप महत्त्वाचं असतं. पुरुष तुलनेनं सौंदर्याची जास्त काळजी घेत नाहीत, किंवा त्यांनी घ्यावी लागत नाही. पण काही महिलांच्या चेहऱ्यावर गाल, कपाळ किंवा नाकाच्या आसपास काळे डाग दिसायला लागतात. सुरुवातीला हे डाग छोटे दिसतात, पण थोड्याच दिवसांमध्ये त्यांचा रंग गडद होऊ शकतो आणि ते जास्त ठळक दिसायला लागतात. यालाच वांग म्हणतात.

जेव्हा तुम्ही जास्त वेळ राहणं, हार्मोन्समधला बदल आणि त्वचेची योग्य काळजी न घेणं यामुळे ही समस्या उद्भवू शकते. चेहऱ्यावरचे वांग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. पण हे उपाय करण्याआधी त्वचेचा प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Dark Spots On Face
HDFC FD Rates : HDFC बँकेचा मोठा निर्णय! FD व्याजदर वाढवले, १० लाखांवर मिळणार एवढा परतावा

चेहऱ्यावर वांग येण्याची प्रमुख कारणे

१. सूर्यप्रकाशाचा संपर्क: उन्हातल्या अतिनील किरणांमुळे त्वचेमध्ये मेलॅनिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसतात.

२. हार्मोन्समधील बदल: गर्भधारणा, गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन्समधील बदलांमुळे वांगाची समस्या व्हायला सुरुवात होते.

३. अनुवंशिकता: कुटुंबातल्या इतर व्यक्तींना वांगाची समस्या असल्यावर काही जणांमध्येही याचा धोका असू शकतो.

४. त्वचेची जळजळ: चुकीची सौंदर्यप्रसाधने किंवा त्वचेला सूट न होणाऱ्या उत्पादनांमुळे काळे डाग निर्माण होऊ शकतात.

Dark Spots On Face
Indian Bank Recruitment : पदवी झाली अन् नोकरी शोधताय? इंडियन बँकेत निघाली १५०० जागांची मेगाभरती; कसा कराल अर्ज?

वांगाचे डाग कमी करण्यासाठी ४ घरगुती उपाय

१. बटाट्याचा रस

बटाटा किसून त्याचा रस काढा. तो आधी हाताच्या छोट्या भागावर लावून तपासा. जळजळ किंवा खाज होत नसेल तर चेहऱ्याच्या छोट्या भागावर वापरू शकता. पण बटाट्याचा रस वांग कमी करतो याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

२. दही किंवा ताक

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असतं. त्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी कमी होतात. मात्र, दही किंवा ताक लावल्यावर वांग पूर्णपणे निघून जातं.

३. केळीचा फेसपॅक

अर्ध पिकलेलं केळं मॅश करून त्यात थोडं मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्याआधी पॅच टेस्ट करा. त्रास होत नसल्यास काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय त्वचेला मऊ ठेवायला मदत करतो.

४. हळद आणि जायफळ

हळद आणि जायफळामध्ये काही नैसर्गिक घटक असतात. जायफळामुळे काही जणांच्या त्वचेवर जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर थेट लावू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.