Hormonal Imbalance होताय? रोजच्या या सवयींमध्ये करा बदल, होईल फायदा

Natural Ways to Balance Your Hormones : चांगल्या आरोग्यासाठी हार्मोनल संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे थायरॉईड, पीसीओडी आणि मधुमेहसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.
Hormonal Imbalance
Hormonal ImbalanceSaam Tv
Published On

How To Balance Hormones :

चांगल्या आरोग्यासाठी हार्मोनल संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे थायरॉईड, पीसीओडी आणि मधुमेहसारख्या (Diabetes) गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आपली जीवनशैली अधिक महत्त्वाची ठरते. परंतु, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपल्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो. तुम्ही रोजच्या सवयींमध्ये बदल केल्यास हार्मोन्सची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. सूर्यप्रकाश

सकाळी कोवळ्या उन्हात गेल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन (Vitamins) डी मिळते. जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशात गेल्याने सेरोटोनिन हार्मोन तयार होतो आणि सर्केडियन क्लॉक सुधारतो ज्यामुळे हार्मोन्स संतुलित राहातात.

Hormonal Imbalance
Hair Falls Issue : केसगळतीमुळे वैतागले आहात? टक्कल पडण्याची भीती वाटते? या ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा

2. व्यायाम करा

नियमितपणे व्यायाम केल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होईल. ज्यामुळे हार्मोनल संतुलित राहिल. दररोज व्यायाम केल्याने शरीरात आनंदी संप्रेरके निर्माण होतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढून वजन नियंत्रणात राहाते. त्यासाठी रोज व्यायाम करायला हवा.

3. प्रथिनेयुक्त आहार

प्रथिनांच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. हार्मोन्स तयार करण्यासाठी शरीराला अमीनो ऍसिडची आवश्यकता असते. कमी प्रथिनांमुळे, अमीनो ऍसिडचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे हार्मोन्सच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा.

Hormonal Imbalance
Diabetes Health : मधुमेहींनो, या भाजीचे सेवन नियमित करा, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

4. तणाव

अधिकचा तणाव घेतल्यामुळे शरीर कोर्टिसोल हार्मोन सोडते. शरीराला तणावाचा सामना करण्यास मदत करते. परंतु, कोर्टिसोल हार्मोनच्या वाढणाऱ्या पातळीमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

5. स्मार्टफोन

स्मार्टफोनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश शरीरासाठी अधिक हानिकारक असतो. रात्री फोनचा अतिवापर केल्यामुळे मेंदू मेलाटोनिन हार्मोनचे प्रमाण कमी करतो. ज्यामुळे झोपेवर परिणाम होऊन हार्मोनल असंतुलन होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com