Valentine Day Offer : पार्टनरला स्मार्टफोन गिफ्ट करुन 'व्हॅलेंटाईन डे' बनवा खास! ऑफरमध्ये मिळेल ४० टक्के सूट

Valentine Day Discount Offer : तुम्ही देखील स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही गॅजेट तुमच्या पार्टनरला देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे.
Valentine Day Offer, Valentine Day Discount Offer
Valentine Day Offer, Valentine Day Discount OfferSaam Tv
Published On

Valentine Day Smartphone Offer :

फेब्रुवारी महिना सुरु झाला की, अनेकांना वेध लागतात व्हॅलेंटाईन डे ची. फेब्रुवारी महिना हा प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास असतो. या काळात अनेक जोडपी विविध माध्यमातून किंवा अनेक नव्या भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

लवकरच व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरु होईल. जर तुम्ही देखील स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही गॅजेट तुमच्या पार्टनरला (Partner) देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. अॅमेझॉन इंडियावर व्हॅलेंटाइन स्मार्टफोन स्टोअरवर सेल सुरु झाला आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन (Smartphone) आणि इतर अॅक्सेसरीजवर ४० टक्क्यांचा डिस्काउंट आपल्याला मिळत आहे.

या सेलमध्ये आपल्याला सॅमसंग ते वनप्लस स्वस्त दरात हँडसेट खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या काळात मोबाईलवर देखील चांगल्या डील मिळत आहे. जाणून घेऊया ऑफर्सबद्दल

1. OnePlus Nord CE 3 Lite ऑफर

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन १८,९९९ रुपयांच्या ऑफरमध्ये मिळत आहे. तसेच याव्यतिरिक्त OnePlus 12 देखील ६३,९९९ रुपयांच्या किंमतीत मिळत आहे. तर OnePlus 11R ची किंमत ३८,९९९ रुपयांना Amazone वर मिळत आहे.

Valentine Day Offer, Valentine Day Discount Offer
VI चा भन्नाट प्लान! दिवसाला खर्च करा १८ रुपये, मिळेल 3GB Data आणि फ्रीमध्ये OTT Subscription

2. Redmi Smartphone

Redmi 12 5G च्या या फोनची किमत १३,४९९ रुपये इतकी आहे. Redmi 12 5G मध्ये युजर्संना Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर मिळत आहे. यात 90 Hz च्या रिफ्रेश रेटसह FHD+ डिस्प्ले आहे. यात 50MP चा रेअर कॅमेरा देखील मिळत आहे. हा हँडसेट 8MP सेल्फी कॅमेरासह मिळतोय. यात 5000mAh बॅटरी मिळते आहे.

3. Poco Smartphone

Amazon India वर व्हॅलेंटाईन डे साठी पोकोचा स्मार्टफोन स्वस्तात मिळत आहे. या सेलमध्ये Poco C51, Poco C55 सारख्या हँडसेटचा समावेश आहे. याची किंमत ५९९९ आणि ७२९९ रुपयाला मिळतो आहे.

Valentine Day Offer, Valentine Day Discount Offer
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : फेब्रुवारी महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण! हा आठवडा थोडा चिंताजनक, खर्चात होईल भरमसाठ वाढ

4. iQOO आणि Nokia Smartphone

iQoo Z7s 5G, iQoo Z7 Pro 5G स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. याची किंमत साधरणत: १५,९९९ रुपये आणि २२,९९९ रुपये इतकी आहे. याशिवाय Nokia G24 5G स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. याची किमत १२,४९९ रुपये इतकी आहे.

5. iPhone 13 वर ही सेल

व्हॅलेंटाइन डेज स्टोअरमध्ये iPhone 13 खरेदी करण्याची सगळ्यात भारी संधी आहे. हा फोन ५०,९९९ रुपयांना मिळत आहे. या फोनला ड्युअल रेअर कॅमेरा सेटअपसह मिळत आहे. तसेच Samsung Galaxy S24 ची किमत ८४९९९ रुपये इतकी आहे. ज्यामध्ये ८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळत आहे. वेबसाइटवर याची किंमत ८९,९९९ रुपये इतकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com