Google Tv App : आता रिमोटची गरज भासणार नाहीच! स्मार्टफोनच्या मदतीने कंट्रोल करा स्मार्ट टीव्ही, फॉलो करा या स्टेप्स

Smartphone control Your Tv : आता स्मार्ट टीव्हीला कंट्रोल करण्यासोबतच मुलांचे टीव्ही पाहाणे देखील कंट्रोल करता येणार आहे.
Google Tv App
Google Tv AppSaam Tv

How To Control Smart Tv : बरेचदा टीव्ही पाहाताना आपण नेमका रिमोट हरवतो किंवा तो ठेवला कुठे हे आठवत नाही. तर कधी कधी मुलं टीव्ही पाहत बसतात व रिमोट कुठं तरी लपवून ठेवतात. त्यामुळे तो शोधताना आपल्या त्रास सहन करावा लागतो.

मुलं एकदा का टीव्ही पाहायला लागली की ती बंद करण्याचे नाव काही घेत नाही. परंतु, आता स्मार्ट टीव्हीला कंट्रोल करण्यासोबतच मुलांचे टीव्ही पाहाणे देखील कंट्रोल करता येणार आहे. जर तुमच्याही घरचा रिमोट हरवला असेल आणि शोधूनही तो सापडत नसेल तर तुम्ही या सोप्या ट्रिक्स वापरु शकता.

Google Tv App
Google AI Tool Launch : Google चं भन्नाट AI टूल, भारतीयांसाठी हिंदी-इंग्रजीत सर्च करण्याची सुविधा

Google Tv अॅपच्या मदतीने आणप Android Tv नियंत्रित करु शकतो. इतकेच नाही तर तुम्ही ही पद्धत अँड्रॉइडसोबत आयफोनमध्येही (iPhone) फॉलो करू शकता. ही ट्रिक्स कशी वापराल जाणून घेऊया.

1. Android फोनवरुन स्मार्ट टीव्ही कसा वापरायचा ते जाणून घेऊया

 • Google Play Store वरून Google TV अॅप डाउनलोड करा.

 • त्यानंतर तुमचा टीव्ही आणि मोबाइल वायफायशी कनेक्ट करा. ब्लूटूथद्वारेही कनेक्ट करु शकतो.

 • अॅपमधील रिमोट बटणावर क्लिक करा.

 • अॅप डिव्हाइस स्कॅन करण्यास सुरुवात होईल. तुमच्या टीव्हीला कनेक्ट करा.

 • त्यानंतर टीव्ही स्क्रीनवर एक कोड येईल. अॅपमध्ये कोड एंटर केल्यानंतर ऑन बटणवर क्लिक करा

 • तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही कनेक्ट झाला की तो रिमोटप्रमाणे काम करु लागेल.

Google Tv App
Hibiscus Hair Pack : कोंड्याच्या समस्येपासून त्रस्त आहात? जास्वंदीचा हेअर पॅक लावून पाहाच, मिळतील अनेक फायदे

2. आयफोनला स्मार्ट टिव्ही कसा कनेक्ट कराल?

 • आयफोन आणि टीव्हीला वायफायशी कनेक्ट करा

 • त्यानंतर अॅप स्टोअरवरुन Google TV अॅप डाउनलोड करा.

 • Google TV अॅपमधील टीव्ही रिमोट आयकॉनवर टॅप करा.

 • अॅप डिव्हाइस स्कॅन केल्यानंतर तो फोनशी कनेक्ट होईल.

 • तुमच्या टीव्ही स्क्रीनवर 6 अंकी कोड दिसेल. अॅपमध्ये कोड एंटर करा आणि पेअर वर टॅप करा. त्यानंतर तुम्ही स्मार्ट टीव्ही कंट्रोल करु शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com