Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mobile Risk: घराबाहेर पडताना मोबाइलचा वायफाय बंद न केल्यास सायबर हल्ले, डेटा चोरी आणि आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
Public WiFi Risks
Mobile WiFi Securitygoogle
Published On

आजच्या युगात इंटरनेट खूप महत्वाचा भाग झाला आहे. काहींना झोपूतून उठल्यापासून ते रात्रीझोपेपर्यंत इंटरनेटची गरज भासते. प्रवासात, कामात, लहान मुलांच्या अभ्यासात, मनोरंजनासाठी आपल्याला इंटरनेटची गरज भासते. मात्र तुमच्या मोबाईलचा Wifi घराबाहेर पडताच बंद करणं महत्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

घराबाहेर पडताना चावी, पाकीट, बॅग आणि मोबाइल यांची आठवण होते. मात्र मोबाईलचा वायफाय बंद करण्याची सवय फारच कमी लोकांमध्ये दिसते. ही सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरू शकते. कारण तुमचा स्मार्टफोन सतत तुमच्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध वायफाय नेटवर्क शोधतं. याच सिन्गल द्वारे तुमच्या मोबाईलचे लोकेशनचा अंदाज लावता येतो.

हॅकर्स या माहितीचा वापर करून बनावट वायफाय नेटवर्क तयार करतात किंवा तुमचा मोबाइलला गुपचूप धोकादायक नेटवर्कशी जोडतात. आजच्या काळात मोबाइलमध्ये बँकिंग अ‍ॅप्स, ओटीपी, पर्सनल मेसेज, आजारांची नोंद आणि तिथले पेपर्स, ऑफीस लॉगिनचे आयडी पासवर्ड साठवलेले असतात. त्यामुळे अशा हल्ल्यांचे परिणाम फक्त तांत्रिक मर्यादेत न राहता आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानही करू शकतात.

Public WiFi Risks
Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानके, कॅफे, मॉल्स आणि हॉटेल्समध्ये वायफाय सहज उपलब्ध असल्याने लोक त्यावर अवलंबून राहू लागले आहेत. मात्र याच सोयीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. अनेक सार्वजनिक वायफाय लॉगिन सिस्टिम्समध्ये ट्रॅकिंग तंत्रज्ञान असते. जे युडर्सच्या परवानगीशिवायही दीर्घकाळ डेटा गोळा करू शकते. काही प्रकरणांमध्ये एन्क्रिप्शन असलेल्या नेटवर्कवरही साइड-चॅनल हल्ल्यांद्वारे माहिती चोरण्यात यश मिळाल्याचे आढळून आले आहे.

सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, घराबाहेर पडताना वायफाय बंद ठेवणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आवश्यक असल्यासच विश्वासार्ह नेटवर्कला हाताने कनेक्ट करावे, असे त्यांचे मत आहे. मोबाइल डेटा किंवा स्वतःचा हॉटस्पॉट वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. सार्वजनिक वायफायवर बँकिंग व्यवहार, पासवर्ड टाकणे किंवा महत्त्वाची माहिती शेअर करणे टाळावे, असेही तज्ज्ञ सांगतात.

Public WiFi Risks
Walking Fitness Routine: रोज १०,००० पावलं चाललात तर होईल चमत्कार, शरीरात असा बदल घडेल की सगळ्यांनाच वाटेल आश्चर्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com