

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे फिटनेस रुटीन हलते. काहींना कामाच्या दगदगीमुळे व्यायामाला वेळच मिळत नाही. अशावेळेस लोक १० हजार पावलं चालण्याचा मार्ग निवडतात. त्यासाठी विविध गॅजेट्स स्मार्ट वॉच अशा उपकरणांचा वापर करतात आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतात. हा आत्ताच्या तरुणाईमधला ट्रेंड झालाय. पण खरचं १० हजार पावले चालल्याने तुम्ही फिट राहता का? हा प्रश्न अनेकांना पडलाच असेल. पुढे आपण याबद्दल तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहोत.
अनेकांना त्यांच्या धावपळीतून व्यायामाला, योग्य आहार घ्यायला, जिमला जायला वेळ मिळत नाही अशावेळेस काही लोक चालण्याचा निर्णय घेतात. दिवसातून किमान १० हजार पावलं चालणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ठ असते. म्हणजेच किमान ५ किलोमीटर चालणे हा निर्णय घेतात. जो शरीरासाठी योग्य आहे. सुरुवातीला कंटाळा येतो पण आठवड्याभरात शरीराला याची सवय होते. याने खूप मोठा फायदा जो तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि चमकत्कारी वाटू शकतो.
जास्त चालण्याच्या सवयीने तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते, तुमच्यामधला आळस दूर होतो, तुमची चिडचिड कमी होतो, आरोग्य उत्तम राहतं, अपचनाच्या समस्या कमी होतात, विचार करण्याची क्षमता वाढते, हाडांचा त्रास कमी होतो. इतकेच नाहीतर तुमचं हदय योग्य रित्या काम करतं. हार्ट अटॅकसारख्या समस्या नाहीशा होतात. तसेच तुमचं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं. स्ट्रेस कमी होतो आणि तुमच्यामध्ये हा बदल काहीच दिवसात जाणवतो.
महत्त्वाचं म्हणजे, या सवयीसाठी जिमची गरज नाही किंवा महागडी उपकरणंही लागत नाहीत. घराभोवती फेरफटका, ऑफिसमध्ये थोडं चालणं, जिने वापरणं किंवा घरातच चालत राहणं, प्रत्येक पाऊल मोलाचं ठरतं. पावले मोजणं फक्त आकडे पूर्ण करण्यासाठी नाही, तर शरीर, मन आणि आरोग्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.