Sakshi Sunil Jadhav
मारुती सुझूकीने भारतीय कार बाजारात विश्वसनीय टिकाऊ आणि कमी खर्चाच्या मजबूत गाड्यांमुळे विशेष स्थान मिळवले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये Maruti ने ४ मुख्य प्रतिस्पर्धांपेक्षा जास्त गाड्यांची विक्री हे सगळ्यात मोठे उदाहरण आहे.
तुम्ही जर नव्या वर्षात १० लाखाच्या आत बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात मारुतीच्या पुढील टॉप ५ गाड्यांची माहिती जाणून घ्या.
बाजारात Maruti Suzuki Wagon R सध्या जास्त विकली जात आहे. याची किंमत ₹5 लाख ते ₹6.95 लाख आहे. टॉल-बॉय डिझाइन, उत्तम मायलेज, कमी मेंटेनन्स आणि वृद्ध नागरिकांसाठी ही कार बेस्ट ठरेल.
Baleno ही मारुतीची कार नव्या डिझाइन, रुंद बॉडी आणि रिलॅक्स इंटीरियरची आहे. चांगली लेगरूम, योग्य आकाराचा बूट आणि सोपा डॅशबोर्ड लेआउट असलेल्या या कारची किंमत ₹6 लाख ते ₹9.10 लाख आहे.
Dzire ही भारतात जास्त विकली गेली आहे. बूट स्पेस, Swift प्लॅटफॉर्म, सेडान लूक देणारी ही मॉर्डन कार ₹6.26 लाख ते ₹9.31 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
Swift ही तरुणांची लोकप्रिय कार आहे. स्पोर्टी डिझाइन, हलकी बॉडी, रिलॅक्स ड्रायव्हिंग अशी ही कूल कार ₹5.79 लाख ते ₹8.80 लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
Brezza ही Maruti ची सर्वात स्वस्त SUV आहे. SUV लूक, जास्त ग्राउंड क्लीअरन्स आणि मजबूत बॉडीमुळे ती ग्राहकांची पहिली पसंती ठरते. Rs 10 लाखांच्या आसपास SUV घ्यायची असल्यास Brezza हा चांगला पर्याय आहे.