Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

Fatty Liver: दारूशिवायही काही सवयी लिव्हर खराब करू शकतात. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी जीवनशैली यामुळे यकृताच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
Fatty Liver
Liver Healthgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना जीवघेण्या समस्यांना सामोरं लागते. दररोजच्या काही सवयी नकळतपणे लिव्हरला मोठं नुकसान पोहोचवतात. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि झोपेच्या उठण्याच्या वेळा यामुळे लिव्हरवरचा हळूहळू ताण वाढतो, मात्र त्याची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. सतत कडवट औषधांचा किंवा कोणत्याही औषधांचा अतिरेक केल्याने लिव्हरमध्ये विषारी घटक साचतात आणि कालांतराने लिव्हरच्या पेशींना गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते.

आजच्या धावपळीच्या जीवनात जास्त प्रमाणात तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतोय. अशा अन्नामुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण येतो आणि शरीरात चरबी साठू लागते. यासोबतच पुरेशी झोप न मिळाल्यास लिव्हरवरची दुरुस्ती प्रक्रिया आणि हार्मोन्सचा समतोल बिघडतो. नियमित झोपेची आणि जेवणाची वेळ न पाळल्यास शरीराची नैसर्गिक उपचार क्षमता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो.

Fatty Liver
Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

बैठी जीवनशैली हीदेखील लिव्हरसाठी घातक ठरू शकतं. हालचाल कमी असल्यास शरीरातील चरबी कमी होत नाही आणि ती लिव्हरमध्ये साठण्याची शक्यता वाढतं. ज्यामुळे लिव्हरचं कार्य मंदावतं. तसेच बाहेरचं जेवण केल्यास चयापचय प्रक्रिया मंदावते आणि लिव्हरमधल्या एन्झाइम्सच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे चरबीचे विघटन योग्य प्रकारे होत नाही.

पाणी कमी पिण्याची सवय देखील लिव्हरच्या डिटॉक्स प्रक्रियेला अडथळा निर्माण करते. पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील घातक विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते आणि लिव्हर सुरळीत काम करते. याशिवाय जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थ, गोड पेये आणि मिठाया खाल्ल्याने साखरेचे चरबीत रूपांतर होऊन लिव्हरमध्ये सूज येऊ शकते. त्यामुळे आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित जीवनशैली स्वीकारणे लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Fatty Liver
Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com