No Tobacco Day: तंबाखुमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका; पाहा शरीरावर कसा होतो परिणाम

No Tobacco Day: कॅन्सरच्या विकासातील सर्वात हानिकारक पदार्थांपैकी एक म्हणजे तंबाखू. त्याचा घातक परिणाम कमी करण्यासाठी कॅन्सरतज्ज्ञ प्रतिबंधात्मक उपाय, वेळोवेळी तपासणी आणि व्यसन सोडण्यावर भर देतात. काळानुरुप तंबाखूचे सेवन टाळणे आणि जीवनमान सुधारणे गरजेचे आहे.
No Tobacco Day
No Tobacco Daysaam tv
Published On

भारतात लाखो कॅन्सरचे पेशंट आहेत आणि धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराने कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूचे व्यसन हे टाळता येण्याजोग्या कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. भारतात मौखिक, फुफ्फुसाच्या, अन्ननलिकेच्या आणि घशाच्या कर्करोगाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कर्करोगतज्ज्ञ वारंवार तंबाखूमुळे त्यांच्या रुग्णांवर होणाऱ्या गंभीर परिणामांची शक्यता तपासण्याकरिता कर्करोगाचा धोका वाढण्यापासून ते या रोगाची जलद प्रगती आणि जगण्याची शक्यता कमी होण्यापर्यंतच्या धोक्याचे निरीक्षण करतात.

No Tobacco Day
Brain tumor: निरोगी व्यक्तींमध्येही दिसतात ब्रेन ट्यूमरची ४ लक्षणं; दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

तळेगावच्या टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रशांत चंद्रा यांनी सांगितलं की, धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांमध्ये हानिकारक रसायनांचा समावेश असतो जो शरीराच्या ऊतींचे नुकसान करतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो आणि उपचारांचा प्रभावी कमी करतो. तंबाखूचे सेवन टाळल्याने कर्करोगाची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचारांमधील परिणाम सुधारू शकतो.

तंबाखू आणि कर्करोग यांच्यातील संबंध

तंबाखूमध्ये निकोटीन, टार आणि कार्सिनोजेन्स सारखी हानिकारक रसायने असतात जी पेशींमधील गुणसुत्रास हानी पोहोचवतात, ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ आणि कर्करोगाची शक्यता वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते, ज्यामुळे शरीराला कर्करोगाशी लढणे कठीण होते.

आधीच कर्करोगाचे निदान झालेल्या लोकांमध्ये, तंबाखूचे वाढते व्यसन ट्यूमरच्या वाढीस चालना देतात आणि केमोथेरपी आणि रेडिएशन सारख्या उपचारांचा प्रभाव कमी करतात. तंबाखूचे व्यसन सोडण्याच्या निर्णयाने तंबाखूशी संबंधित कर्करोगांविरुद्धची लढाई सुरू होते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

No Tobacco Day
Copper Water Safety Tips: तुमच्या या ३ चुकांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी बनतंय विषारी; वेळीच लक्ष द्या

कॅन्सरवरचे उपचार घेत असलेल्यांसाठी, सतत तंबाखूचा वापर केल्याने ही स्थिती अधिक आक्रमक आणि व्यवस्थापित करणे कठीण होऊ शकते. तंबाखूचा परिणाम व्यसनापेक्षा खूप जास्त आहे आणि कर्करोग किती वेगाने पसरतो, शरीर उपचारांना किती चांगला प्रतिसाद देते आणि एकूणच जगण्याची शक्यता यावर त्याचा परिणाम होतो.

No Tobacco Day
Early Puberty: 9 ते 10 वर्षांच्या मुलींना का येतेय मासिक पाळी? जाणून घ्या यामागील मुख्य कारणं

प्रत्येकाने तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन सोडण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. तंबाखूचे व्यसन टाळून आणि त्याबाबत जागरूकता पसरवून, कॅन्सरला प्रतिबंध करणं शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com