Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Exercise for heart health: हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज हेवी वर्कआउट करण्याची गरज आहे का? ब्रिस्क वॉक किती वेळ करावा, आठवड्यात किती दिवस व्यायाम करावा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आहारासोबत व्यायाम का महत्त्वाचा आहे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
Heart health
Heart healthsaam tv
Published On

आजकाल हृदय निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे व्यायाम करतात. काही जण जिममध्ये जाऊन भरपूर वर्कआउट करतात तर काही जण चालणं किंवा हलका व्यायाम करतात. मात्र हार्ट निरोगी ठेवण्यासाठी रोज जिममध्ये जाऊन हेवी व्यायाम करण्याची गरज नाही. आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊन नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं आहे.

फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे चेअरमन आणि प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी एका वेबसाईटला माहिती देताना हृदयाच्या आरोग्यासाठी व्यायामाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते व्यायाम करताना सर्वात आधी आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेतली पाहिजे. अचानक खूप जास्त किंवा जड व्यायाम सुरू करणं योग्य नाही.

दुसऱ्याला पाहून व्यायाम करू नका

प्रत्येक व्यक्तीची शरीराची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे दुसरी व्यक्ती जास्त व्यायाम करते म्हणून आपणही तितकाच व्यायाम करणं गरजेचं नाही. दुसऱ्याचं शरीर किंवा त्याचा वर्कआउट पाहून स्वतःवर जास्त व्यायाम करण्याचा दबाव घेऊ नये.

एखाद्या व्यक्तीने बराच काळ व्यायाम केलेला नसेल तर त्याने अचानक जड वर्कआउट सुरू करणं टाळावं. व्यायामाची सुरुवात हळूहळू करून शरीराला त्याची सवय लावणं गरजेचं आहे.

Heart health
Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

हार्टसाठी ब्रिस्क वॉक फायदेशीर

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ब्रिस्क वॉक म्हणजेच वेगाने चालणे हा एक सोपा आणि चांगला पर्याय आहे. डॉ. अशोक सेठ यांच्या मते, आठवड्यात 150 ते 200 मिनिटे ब्रिस्क वॉक केल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. ही वेळ आठवड्यात 300 मिनिटांपर्यंत वाढवता येते.

दररोज साधारण 40 मिनिटं ब्रिस्क वॉक करण्याचं लक्ष्य ठेवता येतं. मात्र ब्रिस्क वॉक म्हणजे फक्त हळूहळू चालणं नाही. चालताना शरीराला थोडी हालचाल जाणवली पाहिजे आणि श्वास नेहमीपेक्षा थोडा जलद झाला पाहिजे. म्हणजेच चालण्याचा वेग सामान्य चालण्यापेक्षा थोडा जास्त असावा.

आठवड्यात किमान पाच दिवस चालणं

नियमित शारीरिक हालचालींचा फायदा फक्त हृदयालाच होत नाही. वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यात किमान पाच दिवस ब्रिस्क वॉक करण्याचा प्रयत्न करावा. यासोबत आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार वेट ट्रेनिंग देखील करता येते.

Heart health
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

व्यायामासोबत आहारही महत्त्वाचा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी केवळ व्यायामावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. त्यासोबत आहाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. डॉ. अशोक सेठ यांनी आहारात पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेण्याचा सल्ला दिलाय. आहारात डाळी आणि सिझननुसार, मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. त्यामुळे व्यायामासोबत योग्य आहार घेणंही हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं ठरते.

Heart health
Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com