Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Heart Failure Symptoms : हार्ट फेल्युअर नेहमी छातीत दुखणे किंवा अचानक कोसळण्याने सुरू होत नाही. सतत थकवा, पोट फुगणे, वजन वाढणे, लवकर पोट भरणे आणि श्वास घेण्यास त्रास यांसारखी सूक्ष्म लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Heart Failure
Heart Failuresaam tv
Published On

हार्ट फेल्युअर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर एखाद्या व्यक्तीने छातीत हात धरून अचानक खाली कोसळण्याचं चित्र उभं राहतं. मात्र हार्ट फेल्युअर नेहमीच अशा नाट्यमय पद्धतीने होत नाही. उलट त्याची सुरुवात अनेकदा अतिशय शांतपणे होते. शरीरात काही बदल जाणवू लागतात मात्र ते इतके साधे असतात की अनेकजण त्याकडे थकवा, नीट झोप न होणं किंवा अपचन म्हणून दुर्लक्ष करतात.

हार्ट फेल्युअर हे आपल्या कल्पनेपेक्षा अधिक सामान्य आहे. मात्र त्याची सुरुवातीची लक्षणं नेमकी कशी ओळखायची याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे शरीराकडून मिळणारे हे छोटे संकेत समजून घेणं महत्त्वाचं आहे.

कार्डिओलॉजिस्ट आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. दिमित्री यारानोव्ह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीये. डॉ. यारानोव्ह यांनी 9 नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हार्ट फेल्युअर शरीरात सुरुवातीला कसं दिसून येतं याबद्दल माहिती दिली. त्यांनी हार्ट फेल्युअरची 7 अशी सूक्ष्म लक्षणं सांगितली आहेत जी अनेकदा लोकांच्या लक्षातही येत नाहीत.

Heart Failure
Best fruit for cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय? दररोज खा हे एक फळ, रक्तवाहिन्यांमधील चरबी खेचून काढेल बाहेर

डॉ. यारानोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, “हार्ट फेल्युअरची सुरुवात शांतपणे होत असते. खास करून तरुण किंवा एक्टिव्ह व्यक्तींमध्येही याची लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि ती स्पष्टपणे जाणवू लागेपर्यंत वाट पाहू नका.”

हार्ट फेल्युअरची सुरुवात नेहमी छातीत दुखण्याने होत नाही. हार्ट फेल्युअरच्या सुरुवातीला प्रत्येक वेळी छातीत दुखणं किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतीलच असं नाही. अनेक वेळा शरीर हळूहळू काही संकेत देत असतं.

हार्ट फेल्युअरची ही 7 लक्षणं

  • सतत जाणवणारा तीव्र थकवा

  • पोट सतत फुगल्यासारखं वाटणं

  • पोटाभोवतीचे कपडे घट्ट होणं

  • थोडं खाल्ल्यावरही लगेच पोट भरल्यासारखं होणं

  • वारंवार झोप किंवा डुलकी लागणं

  • सतत हलका श्वास घेण्यास त्रास होणं

  • विनाकारण वजन वाढणं

  • लक्षणं साधी वाटली तरी दुर्लक्ष करू नका

Heart Failure
Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

ही सर्व लक्षणं केवळ हार्ट फेल्युअरमुळेच होतात असं नाही. थकवा, पोट फुगणं, वजन वाढणं किंवा श्वास लागणं यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. मात्र ही लक्षणं सतत जाणवत असतील, वाढत असतील किंवा एकापेक्षा जास्त लक्षणं एकत्र दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Heart Failure
High Cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळवेल ही लसणाची चटणी; बनवण्याची पद्धत आताच लिहून घ्या

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com