Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

Diabetes liver problems: डायबेटीस आणि इन्सुलिन रेसिस्टन्सचा लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सतत थकवा, उजव्या बाजूला पोटदुखी, पोट फुगणं, रक्तातील साखरेवर नियंत्रण नसणं आणि लिव्हर तपासण्यांतील बदल ही लक्षणं जाणून घ्या.
Diabetes and liver damage
Diabetes and liver damagesaam tv
Published On

डायबेटीस म्हटलं की, सर्वात आधी रक्तातील वाढलेली साखर आणि इन्सुलिन यांचा विचार आपल्या मनात येतो. मात्र या आजाराचा परिणाम केवळ स्वादुपिंडावर किंवा रक्तातील साखरेपुरता मर्यादित राहत नाही. शरीरातील रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास आणि इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हर, यकृताला सूज येणं यांसारख्या समस्या वाढण्याचा धोका असतो.

तज्ज्ञांच्या मते, टाइप-२ डायबेटीस आणि इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) होण्याची शक्यता अधिक असू शकते. शरीरातील इन्सुलिन योग्य पद्धतीने काम करत नसल्यामुळे ग्लुकोजचा वापर होत नाही. त्याचा परिणाम म्हणून यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.

ही समस्या सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं देत नाही. त्यामुळे व्यक्तीला आपल्याला हृदयाशी संबंधित समस्या आहेत याची जाणीव नसते. आजार वाढत गेल्यानंतरच काही लक्षणं जाणवू शकतात. यकृतावर सतत ताण राहिल्यास सूज, फायब्रोसिस आणि पुढील टप्प्यात लिव्हर सिरोसिस होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

Diabetes and liver damage
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

डायबेटीस असणाऱ्यांमध्ये यकृताच्या समस्येची ५ सुरुवातीची लक्षणं

सतत थकवा जाणवणं

पुरेशी झोप न मिळणं, ताणतणाव किंवा डायबेटीस नियंत्रणात नसणं यामुळेही थकवा जाणवू शकतो. मात्र कोणतंही विशेष कारण नसताना सतत थकवा जाणवत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त अशक्तपणा वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होणं

उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली वेदना, दाब जाणवणं किंवा जडपणा वाटणं हेही काही यकृताच्या आजारांमध्ये दिसू शकतं. अशी अस्वस्थता वारंवार होत असेल वाढत असेल किंवा बराच काळ टिकत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

पोट फुगणं

पोट फुगणं, गॅस किंवा पचनाशी संबंधित समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकतात. मात्र कोणतंही स्पष्ट कारण नसताना सतत पोट फुगत असेल किंवा पचनाच्या तक्रारी होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.

Diabetes and liver damage
Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

रक्तातील साखरेवर नियंत्रण नसणं

डायबेटीस नियंत्रणात असतानाही रक्तातील साखरेमध्ये अचानक चढ-उतार होणं किंवा नेहमीपेक्षा साखर नियंत्रणात ठेवणं कठीण जाणं यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र शरीरातील मेटाबॉलिक आरोग्यात बदल होत असताना काही वेळा फॅटी लिव्हरची समस्याही त्यासोबत दिसून येऊ शकते.

लिव्हरच्या तपासण्यांमध्ये बदल दिसणं

यकृताच्या समस्येचा सुरुवातीचा संकेत नेहमी एखादं लक्षण असेलच असं नाही. नियमित रक्त तपासणीमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर काही चाचण्यांचे रिपोर्ट अयोग्य येऊ शकतात. अशा रिपोर्टमुळे यकृताची पुढील तपासणी करण्याची गरज असल्याचं लक्षात येऊ शकतं. याशिवाय, अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये यकृतामध्ये अतिरिक्त चरबी साचल्याचंही दिसू शकतं.

Diabetes and liver damage
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com