Shruti Vilas Kadam
जेवणानंतर चालल्यामुळे शरीरातील स्नायू ग्लुकोजचा ऊर्जा म्हणून वापर करतात. त्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. मधुमेह किंवा प्री-डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ही सवय विशेष फायदेशीर मानली जाते.
हलके चालल्यामुळे अन्न पोटातून आतड्यांकडे लवकर सरकते. त्यामुळे अपचन, जडपणा आणि जेवल्यानंतर येणारी सुस्ती कमी होण्यास मदत होते.
अनेकांना जेवल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास होतो. 10 मिनिटे चालल्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि गॅस बाहेर पडण्यास मदत होते.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अॅसिडिटी वाढू शकते. मात्र हलक्या गतीने चालल्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि अॅसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ होण्याचा धोका कमी होतो.
जेवणानंतर चालणे म्हणजे मोठा व्यायाम नाही, पण ही छोटी सवय कॅलरी बर्न करण्यास मदत करते. नियमितपणे चालल्यास पोटावरील चरबी कमी करण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो.
दिवसभर जिममध्ये जाण्याची गरज नाही. जेवणानंतरची 10 मिनिटांची चाल शरीराचा मेटाबॉलिझम सक्रिय ठेवण्यास मदत करते आणि दिवसभर अधिक हालचाल करण्याची सवय लागते.
रात्रीच्या जेवणानंतर चालल्यामुळे ब्लड शुगर स्थिर राहते आणि अॅसिडिटी कमी होते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि रात्री अधिक शांत व गाढ झोप लागण्यास मदत मिळते.