Manchow soup Recipe: रेस्टॉरंटसारखा चटपटीत मन्चाव सूप घरी बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

मन्चाव सूप बनवण्यासाठी बारीक चिरलेली कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि काळी मिरी घ्या.

Veg Manchow Soup Recipe

भाज्या परतून घ्या

कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कांदा घाला. काही सेकंद परतल्यानंतर कोबी, गाजर आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर परता.

Veg Manchow Soup Recipe

सॉस आणि मसाले घाला

भाज्या परतल्यानंतर त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, थोडे व्हिनेगर, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

Veg Manchow Soup Recipe

पाणी घालून उकळी आणा

आता कढईत आवश्यकतेनुसार पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घाला. मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्या. भाज्या पूर्णपणे शिजवण्याऐवजी थोड्या क्रंची ठेवल्यास सूपची चव आणखी छान लागते.

Veg Manchow Soup Recipe

कॉर्नफ्लोअरचे मिश्रण तयार करा

एका वाटीत कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे थंड पाणी घालून गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा. हे मिश्रण उकळत्या सूपमध्ये हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा.

Veg Manchow Soup Recipe

सूपला योग्य घट्टपणा द्या

कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर सूप काही मिनिटे शिजवा. सूपला हव्या त्या प्रमाणात घट्टपणा आला की गॅस बंद करा. चवीनुसार मीठ, मिरी किंवा चिली सॉस वाढवू शकता.

Veg Manchow Soup Recipe

गरमागरम मन्चाव सूप सर्व्ह करा

तयार मन्चाव सूप एका बाऊलमध्ये काढा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कुरकुरीत फ्राय केलेले नूडल्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

Veg Manchow Soup Recipe

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

ChatGPT 80s Photo Trend
येथे क्लिक करा