Heart attack: भारतातील जवळपास 90 टक्के हार्ट अटॅकमागे लपलीयेत ही ४ कारणं; वेळीच धोका ओळखून करा उपाय

Heart attack causes in India: भारतामध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. डॉक्टरांच्या मते, जवळपास ९० टक्के हृदयविकाराच्या झटक्यांमागे काही ठराविक कारणे जबाबदार आहेत.
Heart Attack
Heart AttackSaam Tv
Published On

भारतात होणाऱ्या मृत्यूंपैकी एक प्रमुख कारण म्हणजे हार्ट अटॅक. आजकाल तरूणांना देखील हार्ट अटॅक येत असल्याचं पाहायला मिळतंय. २०१४ ते २०१९ दरम्यान भारतात हार्ट अटॅकच्या प्रकरणांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली. शहरीकरण, बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, बैठी जीवनशैली तसंच मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचं वाढतं प्रमाण ही यामागील प्रमुख कारणं आहेत.

हार्ट अटॅक कसा येतो?

ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंपर्यंत जाणारा रक्तप्रवाह थांबतो त्यावेळी हार्ट अटॅक येतो. ही परिस्थिती अधिक करून हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या की होते. रक्तप्रवाह थांबल्याने हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मरू लागतात. वेळेत उपचार न झाल्यास रूग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जवळपास ९९ टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर हे आधीपासून असलेल्या समस्यांमुले होतं. अनेकांचा असा समज असतो की, ते एकदम फीट आणि फाईन आहेत कारण त्यांना काही त्रास जाणवत नाही. मात्र हार्टच्या समस्या शांतपणे वाढत जातात.

हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे शरीरात लपलेले घटक

उच्च रक्तदाब

सतत वाढलेला रक्तदाब धमन्यांना हानी पोहोचवतो आणि प्लाक तयार होण्याचा धोका वाढवतो.

हाय कोलेस्ट्रॉल

अतिरिक्त LDL कोलेस्ट्रॉल तुमच्या धमन्यांमध्ये चरबीचे थर तयार करतो. यामुळे योग्य पद्धतीने रक्तप्रवाह होत नाही.

Heart Attack
Night light exposure cancer risk: रात्री लाईट सुरु ठेवून झोपत असाल तर होईल कॅन्सर; 440 व्होल्टचा झटका देणारं तज्ज्ञांचं नवं संशोधन

मधुमेह

वाढलेली ग्लुकोज पातळी रक्तवाहिन्यांचं नुकसान करते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

धूम्रपान

तंबाखू हृदय आणि रक्तवाहिन्यांना गंभीर इजा पोहोचवतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका अधिक मानला जातो.

काय उपाय करू शकता?

वर दिलेले हे ४ हार्ट अटॅकचे जोखमीचे घटक तुम्ही नियंत्रणात ठेऊ शकता. जीवनशैलीतील बदल आणि वेळेत वैद्यकीय मदत घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

आहारातील बदल

फळं, भाज्या, संपूर्ण धान्यं आणि हेल्दी फॅट्स यांचा समावेश असलेला आहार घ्यावा.

Heart Attack
Late Night Sleep: रात्री उशिरा झोपल्यास गंभीर आजारास पडाल बळी, अशी घ्या काळजी

नियमित व्यायाम

दररोज व्यायाम केल्याने हृदय मजबूत होतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि वजन आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.

धूम्रपान सोडणं

तंबाखू टाळल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

नियमित तपासण्या

रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर यांचं नियमित तपासणी केल्यास समस्या वेळीच लक्षात येण्यास मदत होते.

Heart Attack
Sleep Effects: फक्त ५ ते ६ तास झोप होतेय? आताच सावध व्हा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, वाचा नेमके काय होतात परिणाम

हृदयाच्या समस्यांची लक्षणं कशी ओळखाल?

  • सतत किंवा अधूनमधून छातीत वेदना

  • हात, मान, जबडा किंवा पाठीकडे जाणाऱ्या वेदना

  • श्वास घेण्यास त्रास

  • मळमळ, उलटी किंवा अॅसिडिटीसारखी जळजळ

  • बेशुद्ध पडणं

  • जास्त घाम येणं

  • थकवा

Heart Attack
Stomach diseases: रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका, वाचा डॉक्टरांनी काय म्हणाले?

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com