Stomach diseases: रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका, वाचा डॉक्टरांनी काय म्हणाले?

Late night eating health risks: डॉक्टरांच्या मते, रात्री उशिरा जेवणं ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. पचनक्रिया मंदावते आणि शरीरावर त्याचे थेट परिणाम दिसतात. यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार उद्भवतात.
Stomach diseases
Stomach diseasessaam tv
Published On

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण रात्री उशिरा जेवतात. आता रात्री उशीराचं जेवणं हे सामान्य झालंय. आजकाल लोकांना रात्री उशिरा जेवताना मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहण्याचीही सवय लागलीये. आणि जेवल्यानंतर लोकं लगेच झोपी जातात. मात्र तुम्हाला माहितीये का तुमच्या या सवयीमुळे पोटाचे आजार वाढवतायत.

जरी या सवयी लोकांना फार गंभीर वाटत नसल्या तरी या सवयीमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतायत. रात्री उशिरा खाल्ल्याने पोटाचे आजार का वाढतात आणि ते आतड्याच्या आरोग्यासाठी कसं धोकादायक ठरतं याची माहिती तज्ज्ञांनी दिलीये.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय झालीये आणि लोकांना त्याचे परिणाम समजत नाहीत. उशिरा जेवल्याने पोटावर लगेच परिणाम दिसून येत नाहीत. पण या सवयीमुळे काही काळाने पोटाचे आजार वाढू शकतात.

Stomach diseases
Mouth symptoms heart attack: तुमच्या तोंडामध्ये दिसतात 'ही' ६ लक्षणं देतात हार्ट अटॅक येण्याचे संकेत; इग्नोर करणं ठरेल धोकादायक

रात्री उशीर जेवल्याने पोटाच्या कोणत्या समस्या होऊ शकतात ते पाहूयात.

सर्केडियम रिदमवर परिणाम

शरीर सर्कॅडियन रिदम नावाच्या बायोलॉजिकल क्लॉकवर चालतं. आपली पचनसंस्था ही दिवसा जास्त एक्टिव्ह असल्याचं मानलं जातं. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्न पचवण्याची त्याची क्षमता जास्त असते. रात्र होताच शरीर विश्रांती घेतं. जर तुम्ही रात्री उशिरा जेवलात तर पचनक्रिया पुन्हा कामाला लागते. यामुळे शरीराचं नॅचुरल रिदम बिघडतं.

चयापचय क्रिया मंदावते

रात्रीच्या वेळी शरीराचा चयापचय दर मंदावतो. याचाच अर्थ अन्न पचवण्याची आणि त्याचं उर्जेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया मंदावते. ज्यावेळी लोकं रात्री उशिरा जेवतात त्यावेळी अन्न व्यवस्थित पचत नाही. यामुळे त्यातील बहुतेक भाग चरबीमध्ये रूपांतरित होतो. परिणामी शरीरात चरबीचा साठा वाढतो. यामुळे तुमचं वजन वाढण्याचाही धोका असतो.

एसिडीटीचा त्रास

रात्री उशिरा जेवल्याने पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. जर जेवणानंतर लगेच झोपलात छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. जर हे दररोज चालू राहिलं तर अन्ननलिकेच्या आतील थराला सूज येण्याचा धोका असतो.

Stomach diseases
Silent heart attack symptoms: सायलेंट हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' मोठे बदल; संकेत लक्षात येणं फारच कठीण

आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियावर होतो परिणाम

आतड्यांमध्ये चांगल्या आणि वाईट बॅक्टेरिया असतात. ज्याला आतड्यातील मायक्रोबायोटा म्हणतात. ज्यावेळी लोकं रात्री उशिरा चिप्स, बिस्किटं, आईस्क्रीम आणि कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात तेव्हा ते आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना हानी पोहोचते. यामुळे गॅस आणि पोटफुगी, पोटदुखी किंवा जुलाब यांसारख्या समस्या उद्भवतात.

Stomach diseases
Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या

झोपेवर परिणाम

रात्री उशिरा जेवल्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो. याचा तुमच्या पोटावरही विपरीत परिणाम होत असतो. ज्यावेळी तुमचं पोट भरलेलं असतं आणि एसिड तयार होत असतं तेव्हा झोप येणं कठीण होऊ शकतं. एसिड आणि गॅस जमा झाल्यामुळे लोक रात्रभर अस्वस्थता जाणवते. ज्यामुळे त्यांना सकाळी थकवा जाणवतो. परिणामी हार्मोनल संतुलन बिघडून पचनक्रिया आणखी बिघडू शकते.

Stomach diseases
Heart attack symptoms: सकाळी बेडवरून उठताच ही ६ लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे; वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com