Sleep Effects: फक्त ५ ते ६ तास झोप होतेय? आताच सावध व्हा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, वाचा नेमके काय होतात परिणाम

Mental Health: दररोज फक्त ५ ते ६ तास झोप घेणे शरीर आणि मनासाठी धोकादायक ठरते. तज्ज्ञ सांगतात की अपुरी झोप मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम करते.
Effects of sleeping only 5 to 6 hours daily
Lack of sleep and its health impactsaam tv
Published On
Summary

दररोज फक्त ५ ते ६ तास झोप घेणे आरोग्यासाठी घातक आहे.

कमी झोपेमुळे थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक ताण वाढतो.

दीर्घकाळ अपुरी झोप घेतल्यास हृदयविकार, मधुमेहाचा धोका वाढतो.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांचे झोपेकडे दुर्लक्ष होत असतं. विशेषत: तरुणांचे झोपेकडे दुर्लक्ष होत असतं. कामाचा ताण, सोशल मीडियाचा अतिवापर आणि वैयक्तिक वेळ मिळवण्यासाठी अनेकजण झोपेवर तडजोड करतात. पण तज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त ५ ते ६ तासांची झोप घेणं शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं.

तज्ज्ञ सांगतात की, प्रौढ व्यक्तींना दररोज किमान सात तासांची झोप आवश्यक असते. कमी झोप घेतल्याने शरीरात थकवा येतो, एकाग्रता कमी होते आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. झोपेची कमतरता बऱ्याच काळ असेल तर स्ट्रेस, डिप्रेशन, गोष्टी लक्षात न राहणे आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे अशा समस्या जाणवू शकतात.

Effects of sleeping only 5 to 6 hours daily
Winter Eye Care: धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

कमी झोपेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. यामुळे डायबेटीज, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. संशोधनानुसार, रोज फक्त ५ ते ६ तास झोप घेणाऱ्यांचा अचानक मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. याशिवाय अपुऱ्या झोपेमुळे वाहन चालवताना झोप येणे, अपघात होणे अशा घटना घडू शकतात.

झोपेची कमतरता मेंदूच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम करते. लक्ष केंद्रीत करणे अवघड होते, स्मरणशक्ती कमजोर होते आणि दिवसभर सुस्ती येते. शारीरिकदृष्ट्याही याचे परिणाम दिसतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सूज आणि थकवा हे लक्षणे झोपेअभावी दिसतात. तज्ज्ञ सांगतात की प्रत्येक वयोगटानुसार झोपेची गरज वेगळी असते. १८ वर्षांवरील व्यक्तींना ७ ते ८ तास, तर किशोरवयीन मुलांना ८ ते १० तासांची झोप आवश्यक आहे. ६ ते १२ वर्षांच्या मुलांना ९ ते १२ तास आणि लहान बालकांना ११ ते १४ तास झोप घेणे अत्यावश्यक असते.

Effects of sleeping only 5 to 6 hours daily
Ratalyache Kaap: वरण भातासोबत करा रताळ्याचे कुरकुरीत काप; वाचा सोपी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com