Winter Eye Care: धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

Air Pollution: हवेतील प्रदूषण, धूर आणि स्मॉगमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात. कोरडेपणा, जळजळ, लालसरपणा आणि ग्लॉकोमा धोका वाढतो. तज्ज्ञ सांगतात, या काळात डोळ्यांची विशेष काळजी कशी घ्यावी.
Air Pollution
Winter Eye Caresaam tv
Published On

सणासुदीचा हंगाम सुरु आहे आणि उत्सवांच्या रोषणाईने वातावरण उजळले आहे. तथापि, हिवाळ्याच्या आगमनासोबतच आपल्या शहरांमध्ये दरवेळचा एक परिचित पॅटर्न दिसून येतो. कमी तापमान, मंद वारे आणि तापमानातील उलटफेर. यामुळे थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर तयार होतो आणि प्रदूषणामुळे तयार झालेले धुलीकण जमिनीच्या जवळ अडकतात. यालाच आपण 'स्मॉग' (धूर आणि धुक्याचं मिश्रण) म्हणून ओळखतो. याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो का? आणि याची काळजी कशी घेतली पाहिजे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात डॉ.अरुण सिंघवी, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, एएसजी आय हॉस्पिटल्स यांच्याकडून.

Air Pollution
Belly Fats Tips: मेथी दाणे की बडीशेप पाणी? बारिक होण्यासाठी काय आहे योग्य? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आपली फुफ्फुसे याचा त्रास होत असल्याची लक्षणे दाखवण्याच्या आधीच आपल्या डोळ्यांना सर्वप्रथम याचा त्रास सुरु होतो. डोळे चुरचुरणे, पाणी येणे, लाल होणे अशी लक्षणं दिसू लागतात. या हिवाळ्यात मात्र चांगली पूर्वतयारी करून डोळ्यांच्या प्रतिबंधात्मक काळजीने हे दुष्टचक्र मोडूयात! गेल्या वर्षी राजधानी क्षेत्रात रात्रीच्या वेळेस प्रदूषणाचे धोकादायक वाढीचे प्रमाण नोंदवले गेले होते. तिथे PM2.5 पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेक पटीने अधिक होती. रात्रीच्या वेळी प्रदूषण 603 µg/m³ इतके झाले होते. ते सुरक्षित मानकांपेक्षा अनेक पटीने जास्त आणि आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. संदर्भासाठी पाहायचं झालं तर भारतातील 24-तासाची PM2.5 मर्यादा (नॅशनल अॅम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्सनुसार) 60 µg/m³ इतकी आहे. धुरकट हिवाळ्यात आधीपासूनच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊयात.

हे आकडे आपल्या दृष्टीसाठी का महत्त्वाचे आहेत ? सूक्ष्म धूलिकण आणि वायू प्रदूषक डोळ्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘टिअर फिल्म’ ला म्हणजेच डोळ्यांवरील सूक्ष्म द्रवपातळीला बाधा पोहोचवतात आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला सूज आणतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की PM2.5 च्या वाढलेल्या संपर्कामुळे डोळे कोरडे पडणे, जळजळ, लालसरपणा, पाणी येणे यांसारखी लक्षणे अधिक वारंवार आणि तीव्र होतात आणि डोळ्यांच्या पृष्ठभागावर जाणवण्याइतपत बदल होतात.

प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्काचे डोळ्यावर परिणाम ? काळजी करण्याचे आणखी एक कारण आहे. प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांतील अंतर्गत दाब वाढतो आणि कायमस्वरूपी अंधत्वाचे प्रमुख कारण असलेल्या ग्लॉकोमा (glaucoma) चा धोका अधिक वाढतो. PM2.5 आणि संबंधित प्रदूषक डोळ्यांबाबत विशेषतः संवेदनाक्षम व्यक्तींमध्ये हा धोका वाढवतात. म्हणून, ज्या लोकांना आधीच ग्लॉकोमा आहे किंवा वय, मधुमेह किंवा कुटुंबात आधी कुणाला असेल तर त्यांना अधिक धोका आहे.

त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या नेत्रतज्ज्ञांचा नियमित सल्ला घ्यावा. स्मॉग सुरू होण्याआधीच पूर्वतयारी म्हणून डोळ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे! जर तुम्हाला ग्लॉकोमा, मधुमेह असेल, नुकतीच डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा कायम डोळे कोरडे राहत असतील तर नेत्रतपासणी करा आणि डोळ्यांतील अंतर्गत दाबाची नोंद ठेवा. औषधे वेळेवर घ्या आणि एकही डोस चुकवू नका. घरातील आतली हवा स्वच्छ आणि ओलसर ठेवा. बाहेरील हवा चांगली असताना वायुविजन करा, स्वयंपाक करताना एक्झॉस्ट वापरा आणि शक्य असल्यास घरगुती हवेचे शुद्धीकरण करणारे (air purifiers) आणि आर्द्रता राखणारी (humidifiers) उपकरणे वापरण्याचा विचार करा.

प्रदूषित हवेत डोळ्यांची काळजी ? हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index - AQI) खराब असताना बाहेर जाणे टाळा आणि 'खूप खराब' किंवा 'गंभीर' स्थितीत रात्री किंवा सकाळी लवकर बाहेर पडून श्रम पडतील अशा क्रिया करू नका. लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरा. ते टिअर फिल्म स्थिर ठेवण्यास मदत करतात. महत्त्वाचे म्हणजे, स्वतःहून औषधांच्या दुकानातून मिळणारे स्टेरॉइड ड्रॉप्स वापरू नका. त्यामुळे झालेला संसर्ग दडपला जाऊ शकतो आणि डोळ्यांचा दाब वाढू शकतो.

सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे डोळ्यांवर होणाऱ्या जखमा, भाजणे आणि छिद्र पडणे यात वाढ दिसून येते. याला प्रतिबंध करता येऊ शकतो. पूर्व भारतातील एका अभ्यासाने दाखवले की फटाक्यांशी संबंधित जखमा सर्व नेत्र-आघातांच्या 20% आहेत. कोणताही सण जबाबदारीने साजरा करणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे हा सणांच्या परंपरेचा भाग बनायला हवेत. जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि फटाक्यांचा वापर करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. अंतर ठेवा, मुलांचे रक्षण करा, फटाके उडवताना कधीही त्यावर वाकू नका. तुम्ही फक्त पाहत असलात तरी सावध राहा. डोळ्यांच्या जखमा लांबून फटाके पाहणाऱ्यांनाही होऊ शकतात.

धूर किंवा स्मॉगच्या वातावरणात विशेष काळजी ? कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी धूर किंवा स्मॉगच्या वातावरणात विशेष काळजी घ्यावी आणि फटाक्यांच्या आसपास असताना चष्मा घालणे पसंत करावे. संरक्षणात्मक चष्मे सणाच्या पोशाखाशी कदाचित जुळत नसतील, पण ते आठवणी आणि आजीवन अपंगत्व यांच्यात फरक करू शकतात. जर जखम झाली तर डोळ्यावर मलम लावू नका किंवा अडकलेले कण काढण्याचा प्रयत्न करू नका; डोळ्याला हलक्या हाताने झाकून जवळच्या नेत्रसेवा केंद्रात तत्काळ जा. जर डोळ्यात बाह्यकण असल्याची जाणीव होत असेल तर डोळे चोळू नका.

स्वच्छ पाण्याने डोळे चांगले धुवा आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. डोळे हे क्षमाशील अवयव नाहीत; एकदा त्यांना हानी पोहोचली की काही नुकसान अपरिवर्तनीय असते. परंतु जर आपण काळजी घेतली तर या काळात उद्भवणारे धोके मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. पूर्वतयारीने डोळ्यांची काळजी घेणे म्हणजे दृष्टी सुरक्षित ठेवणे. जेणेकरून आपण या वर्षी आणि पुढील प्रत्येक वर्षी, सणासुदीचा आणि हिवाळ्याचा आनंद घेत राहू शकू !

Air Pollution
Vitamin D Side Effects: व्हिटॅमिन Dच्या जास्त डोस घेतल्यास किडनी स्टोनचा धोका, तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com