High cholesterol: हार्ट अटॅक येण्याआधी मिळणारा 1 सायलेंट इशारा, डोळ्यांमध्ये दिसणारं लक्षण अजिबात दुर्लक्षित करू नका

High cholesterol symptoms: डोळ्यांभोवती पिवळ्या गाठी, वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराचा धोका यांचा संबंध जाणून घ्या. कोलेस्ट्रॉलची लक्षणे, ब्लड टेस्ट, धोके, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय जाणून घ्या.
high cholesterol
cholesterol symptomsgoogle
Published On

आपल्या शरीरात अनेक आजार असे असतात जे सुरुवातीला कोणतीही मोठी लक्षणं दाखवत नाहीत. त्यामुळे अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हाय कोलेस्ट्रॉल हा त्यापैकीच एक गंभीर आजार आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढत असलं तरी सुरुवातीला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र हळूहळू त्याचा परिणाम रक्तवाहिन्या, हृदय आणि मेंदूवर होऊ लागतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तुमचे डोळेही वाढलेल्या कोलेस्ट्रॉलबाबत माहिती देत असतात. त्यामुळे काही लक्षणं वेळेत ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं.

डोळ्यांभोवती दिसणाऱ्या पिवळ्या गाठी

डोळ्यांच्या वरच्या किंवा खालच्या पापण्यांजवळ पिवळसर रंगाच्या छोट्या गाठी दिसू लागल्या तर त्या हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतात. या गाठींना झँथेलाझ्मा (Xanthelasma) असं म्हणतात. अशा गाठी दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही वेळा या गाठी डोळ्यांशी संबंधित गंभीर समस्यांचाही इशारा देऊ शकतात.

कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी काय करावं?

कोलेस्ट्रॉलची पातळी जाणून घेण्यासाठी साधी ब्लड टेस्ट पुरेशी असते. या तपासणीनंतर डॉक्टर तुमचा रिपोर्ट समजावून सांगतात आणि गरज असल्यास पुढील उपचार किंवा जीवनशैलीतील बदल सुचवतात.

कोलेस्ट्रॉल रिपोर्टमध्ये कोणते आकडे महत्त्वाचे असतात?

रक्त तपासणीच्या अहवालात साधारणपणे तीन महत्त्वाचे प्रकार दिसतात.

टोटल कोलेस्ट्रॉल

शरीरातील एकूण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण यामध्ये दाखवलं जातं. निरोगी व्यक्तीसाठी हे प्रमाण साधारणपणे 5 mmol/L पेक्षा कमी असणं योग्य मानलं जातं.

HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल

याला गुड कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्याची पातळी 1 mmol/L पेक्षा जास्त असणं फायदेशीर मानलं जातं.

Non-HDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल

हे कोलेस्ट्रॉल शरीरासाठी जास्त धोकादायक मानलं जातं. त्याचं प्रमाण शक्यतो 4 mmol/L पेक्षा कमी असावं.

काही वेळा डॉक्टर QRISK स्कोअरही सांगतात. या स्कोअरच्या मदतीने पुढील दहा वर्षांत हार्ट अटॅक किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित आजार होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

हाय कोलेस्ट्रॉल शरीरावर कसा परिणाम करतो?

रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढल्यावर रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूला चरबीचा चिकट थर साचू लागतो. यालाच प्लाक असे म्हणतात. हळूहळू हा थर जाड होत जातो आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयापासून शरीराच्या इतर भागांपर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो.

high cholesterol
Liver cancer symptoms: लिव्हरचा कॅन्सर होण्यापूर्वी पायांमध्ये ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात

हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास छातीत दुखणे म्हणजेच अँजायना होऊ शकतं. परिस्थिती गंभीर झाल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढतं. याचबरोबर मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

कोणत्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलचा धोका जास्त असतो?

टाइप-2 मधुमेह आणि लठ्ठपणा

मधुमेह किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते.

चुकीचा आहार

सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असलेले पदार्थ वारंवार खाल्ल्यास शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं.

शारीरिक हालचालींचा अभाव

व्यायाम न करणं किंवा दिवसभर बसून राहण्याची सवयही कोलेस्ट्रॉल वाढण्यामागील महत्त्वाचं कारण ठरू शकतं.

high cholesterol
Early cancer signs: तुमच्या शरीरातही दिसतायत का हे ५ बदल? कॅन्सरची सुरुवात याच लक्षणांनी होते, तज्ज्ञांचा इशारा

आनुवंशिक कारण

काही लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास कुटुंबातूनच येतो. त्यामुळे कुटुंबात हा त्रास असेल तर अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

वय किंवा आनुवंशिक कारणं बदलता येत नाहीत. मात्र योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारून धोका नक्कीच कमी करता येतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे?

  • आहारात छोटे बदल केले तरी त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

  • पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, पांढऱ्या ब्रेडऐवजी होलग्रेन ब्रेड आणि साध्या पास्ताऐवजी होलव्हीट पास्ता निवडणेही फायदेशीर ठरते.

  • खाण्याच्या मधल्या वेळेत केक, बिस्किटं किंवा गोड पदार्थ खाण्याऐवजी सुकामेवा, बिया आणि ताजी फळे खाण्याची सवय लावावी.

दररोज थोडा व्यायामही तितकाच महत्त्वाचा

केवळ आहार बदलून चालणार नाही, तर शरीराची नियमित हालचालही आवश्यक आहे. दररोज किमान 20 मिनिटे चालणं, वेगाने चालणं, सायकल चालवणं, पोहणं किंवा आवडीचा कोणताही खेळ खेळणं फायदेशीर ठरतं.

high cholesterol
Early cancer signs: तुमच्या शरीरातही दिसतायत का हे ५ बदल? कॅन्सरची सुरुवात याच लक्षणांनी होते, तज्ज्ञांचा इशारा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com