Liver cancer symptoms: लिव्हरचा कॅन्सर होण्यापूर्वी पायांमध्ये ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हरचा कॅन्सर

दीर्घकाळ लिव्हरचे आजार, हिपॅटायटिस बी किंवा सी संसर्ग आणि लिव्हर सिरोसिस ही लिव्हर कॅन्सरची प्रमुख कारणं मानली जातात. जास्त मद्यपान, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा यामुळेही धोका वाढू शकतो. तसंच काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही हा आजार होऊ शकतो.

liver tumor symptoms | saam tv

किती धोकादायक असतो हा कॅन्सर?

लिव्हर कॅन्सर हा जीवघेणा आजार मानला जातो कारण तो शरीरातील महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम करतो. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. या कॅन्सरची पायांमध्ये कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

cancer awareness | saam tv

पायांमध्ये सूज येणं

लिव्हर नीट कार्य करत नसल्यास शरीरात द्रव साचू लागतो आणि पायांना सूज येऊ शकते. ही सूज विशेषतः घोटे आणि पावलांमध्ये अधिक दिसते. दीर्घकाळ टिकणारी किंवा वाढणारी सूज दुर्लक्षित करू नये.

muscle cramps | saam tv

पायांमध्ये सतत वेदना

लिव्हरच्या गंभीर समस्यांमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पायांमध्ये जडपणा, ताण किंवा वेदना जाणवू शकतात. विश्रांती घेतल्यानंतरही ही समस्या कायम राहू शकते.

liver cancer signs | saam tv

पायाला खाज येणं

लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यास शरीरात पित्त साचू शकतं. यामुळे पायांसह शरीराच्या विविध भागांवर खाज येऊ शकते. अनेकदा ही खाज कोणत्याही पुरळाशिवाय जाणवते.

liver health | saam tv

पायांमध्ये वारंवार गोळे येणं

लिव्हरचं आरोग्य बिघडल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बदलू शकतं. त्यामुळे पायांच्या स्नायूंमध्ये वारंवार गोळे येण्याची समस्या उद्भवू शकते. विशेषतः रात्री झोपताना ही तक्रार अधिक जाणवू शकते.

fatty liver disease | saam tv

पायांमध्ये अशक्तपणा

लिव्हर कॅन्सरमुळे शरीराची ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे चालताना पाय अशक्त वाटणं किंवा शक्ती नसल्यासारखं वाटू शकतं. जर तुम्हालाही ही लक्षणं दिसत असली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

hepatitis B | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack symptoms | saam tv
येथे क्लिक करा