Tata Motors : टाटाचं व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाचं पाऊल ! जेएनव्‍हीसोबत सहयोग करणारी पहिली ऑटोमोटिव्‍ह कंपनी

Tata Motors Plan Javahar Navoday vidhyalay : जेएनव्‍हीच्‍या वि़द्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष ऑटोमोटिव्‍ह कौशल्‍ये व औद्योगिक अनुभव प्रदान करण्‍यात येईल.
Tata Motors
Tata MotorsSaam Tv
Published On: 

Tata Motors In Automobile sector : टाटा मोटर्स ही भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल कंपनीने जवाहर नवोदय विद्यालयासोबत (जेएनव्‍ही) सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत 'राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०'मध्‍ये दृष्टिकोन ठेवण्‍यात आलेल्‍या व्‍यावसायिक कोर्सेसचा भाग म्‍हणून जेएनव्‍हीच्‍या वि़द्यार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष ऑटोमोटिव्‍ह कौशल्‍ये व औद्योगिक अनुभव प्रदान करण्‍यात येईल.

२०२२ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेला हा उपक्रम गुजरात, महाराष्‍ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तरप्रदेश व उत्तराखंड येथील २५ जेएनव्‍हींमध्‍ये राबवण्‍यात आला आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत २५०० विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे आणि यंदा या प्रशिक्षणामध्‍ये ५००० विद्यार्थ्‍यांचा सहभाग होण्‍याची अपेक्षा आहे.

Tata Motors
Monsoon Car Driving Tips: पावसाळ्यात कार घेऊन फिरायला जाताय ? ड्राइव्ह करण्यापूर्वी या गोष्टी तपासून मगच घराबाहेर पडा !

या उपक्रमांतर्गत टाटा मोटर्स जेएनव्‍हीच्‍या विद्यार्थ्‍यांना व्‍यावसायिक कौशल्याकरिता ऑटोमोटिव्‍ह कोर्सेस देण्‍यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील आपल्‍या व्‍यापक कौशल्‍याचा वापर करत आहे. हा कोर्स इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्‍या विद्यार्थ्‍यांना ऑफर करण्‍यात आला आहे, तसेच अभ्‍यासक्रम व प्रयोगशाळा सेटअप सीबीएसई मार्गदर्शकतत्त्वांनुसार आणि टाटा मोटर्स टीमने प्रदान केलेल्‍या माहितीनुसार डिझाइन करण्‍यात आला आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्‍यांना शालेय परिसरात प्रत्‍यक्ष ऑटोमोबाइल कौशल्‍ये व उद्योग अनुभवासह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.

टाटा मोटर्सने २५ जेएनव्‍ही शाळांमध्‍ये आवश्‍यक 'ऑटोमोटिव्‍ह स्किल लॅब' निर्माण केली आहे आणि या व्‍यावसायिक विषयांचे अध्‍यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण उपक्रम देखील राबवले आहेत. जमेशदपूर येथील टाटा मोटर्स प्‍लांटमध्‍ये प्रशिक्षण देण्यात आले. व्‍यावसायिक ऑटोमोटिव्‍ह कौशल्‍यांसह शालेय शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर विद्यार्थी डिप्‍लोमा इन मेकट्रॉनिक्‍स कोर्स करू शकतात, या कोर्ससाठी टाटा मोटर्सकडून पूर्णत: निधीसाह्य करण्‍यात येईल. वि़द्यार्थ्‍यांना कंपनीकडून वेतन कमावण्‍याची संधी मिळण्‍यासोबत टीएमएल उत्‍पादन केंद्रामध्‍ये रोजगार प्रशिक्षण मिळते. यानंतर विद्यार्थी ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये रोजगार संधींचा शोध घेऊ शकतात किंवा अभियांत्रिकीमध्‍ये बी.टेक कोर्स करू शकतात आणि करिअरच्‍या दिशेने वाटचाल करू शकतात.

Tata Motors
Shiv Temple : ठाणे जिल्ह्यातील ९५० वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवमंदिराचे रहस्य माहिती आहे का?

टाटा मोटर्स (Tata Motors) येथील सीएसआर प्रमुख श्री. विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ''आम्‍ही देशातील तरूणांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि हे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी अपस्किलिंग महत्त्वाचे आहे. आम्‍हाला वंचित समुदायांमधील विद्यार्थ्‍यांना रोजगारक्षम करण्‍यासाठी जवाहर नवोदय विद्यालयासोबत सहयोगाने काम करण्‍याचा आनंद होत आहे, यामुळे त्‍यांच्‍या करिअर महत्त्वाकांक्षांना देखील चालना मिळेल.

व्‍यावसायिक (Business) शिक्षणामध्‍ये कोर्सची प्रगती विद्यार्थ्‍यांना या क्षेत्रात त्‍यांचे करिअर घडवण्‍यास मदत करते. तसेच हा प्रकल्‍प 'स्किल इंडिया मिशन' अंतर्गत टॅलेंटला निपुण करण्‍याप्रती, तरूणांना सक्षम करण्‍याप्रती आणि ऑटोमोटिव्‍ह उद्योगामधील कौशल्‍य पोकळी दूर करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो. आम्‍हाला जेएनव्हींसोबत सहयोगाने संलग्‍न व कुशल कर्मचारीवर्गाला आकार देण्‍यासोबत भविष्यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग तयार करण्‍याचा आनंद होत आहे.''

Tata Motors
Famous Couple Spots in Mumbai : प्रेमीयुगुलांनो, एका दिवसात मुंबई फिरायची आहे? ही ठिकाणे आहेत बेस्ट !

नवोदय विद्यालय संघटनेचे कमिशनर (आयुक्‍त) श्री. विनायक गर्ग म्‍हणाले, ''आम्‍हाला या अद्वितीय उपक्रमासाठी टाटा मोटर्ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या उपक्रमांतर्गत आम्‍ही विद्यार्थ्‍यांना एनईपी २०२० नुसार शैक्षणिक व व्‍यावसायिक शाखांमधील सर्वांगीण शिक्षण देत आहोत. हा सहयोग विद्यार्थ्‍यांना विशेषत: करिअर किंवा ट्रेडमध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी आवश्‍यक ज्ञान व कौशल्‍ये आत्‍मसात करण्‍यास सक्षम करेल आणि त्‍यांना ऑटोमोटिव्‍ह उद्योगामधील विद्यमान ट्रेण्‍ड्सची ओळख करून देईल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.