कोमल दामुद्रे
मुंबईत आल्यावर फिरण्यासाठी एलिफंटा लेणी हे खूप चांगले ठिकाण आहे. एलिफंटा लेणी घारपुरी येथे आहे. यासाठी तुम्ही गेट वे ऑफ इंडियावरुन जहाजानेही जाऊ शकतात.
समुद्राचा आनंद घेण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह ही सर्वात चांगली जागा आहे. मरीन ड्राइव्हला जाण्यासाठी मरीन लाइन्स,चर्चगेट या स्टेशनवरुन जाऊ शकतात.
प्राणी आणि निसर्गाचा एकत्र अनुभव घेण्यासाठी 'संजय गांधी नॅशनल पार्क' ही खूप चांगली जागा आहे. 'संजय गांधी नॅशनल पार्क' बोरीवली येथे आहे. पार्कमध्ये जाण्यासाठी ४८रुपये तरुणांसाठी तर लहान मुलांसाठी ३१ रुपये एन्ट्री फी आहे.
मुंबई आणि बॉलिवूडचं वेगळंच नात आहे. बॉलिवूडची टूर करायची असेल तर एस.जे स्टुडिओ हा चांगला पर्याय आहे.
रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे घाटकोपर वेस्टला आहे. या म्युझियममध्ये २५० रुपये तिकिट वींकडेला तर वींकेडला ५० रुपयांचे तिकीट असते.
समुद्राच्यामध्ये असलेला हाजी अली दर्गा मुंबईचे खास आकर्षण आहे. हाजी अली दर्गा दर्गा रोड येथे आहे.
भारतातील ऐतिहासिक स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ओळखले जाते. येथून पाहता येणारा नजारा हा खूप सूंदर असतो. येथे सीएसमटी रेल्वे स्टेशनवरुन जाऊ शकता.
जर सनसेट पाहायचा असेल तर सर्वात चांगले ठिकाण म्हणजे जुहू बीच. जुहू बीचला अंधेरी रेल्वे स्टेशनवरुन जाऊ शकतात.
मुंबईत बर्फ पडत नाही. पण बर्फाळ प्रदेशाचा अनुभव घ्यायचा असेल तर स्नो वर्ल्डला नक्कीच भेट द्या.मुंबईतील फिनिक्स मॉल आणि आरसीटी मॉलमध्येही स्नो वर्ल्डचा आनंद घेऊ शकता.
अनेक चित्रपटात एस्सेल वर्ल्ड पाहिले असेलच. याच एस्सेल वर्ल्डला जाण्यासाठी बोरीवलीवरुन जाऊ शकता. याची एन्ट्री फी ३९० ते १२९० रुपयांपर्यंत आहे.