Hydrate Drink : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायचीये? या ड्रिंक्सचा करा समावेश

Summer Drink : उन्हाळ्यात आपण आरोग्याची काळजी अधिक प्रमाणात घेतो. या काळात आपल्याला सगळ्यात जास्त समस्या जाणवते ती डिहायड्रेशनची. त्यातच जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
summer Hydrate Drink
summer Hydrate Drink Saam Tv

Control Blood Sugar In Summer Season :

उन्हाळ्यात आपण आरोग्याची काळजी अधिक प्रमाणात घेतो. या काळात आपल्याला सगळ्यात जास्त समस्या जाणवते ती डिहायड्रेशनची. त्यातच जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात हायड्रेट राहाण्यासाठी आपण कोल्ड ड्रिंकचे सेवन करतो. ज्यामुळे रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढते. अशावेळी आपण कोणत्या ड्रिंक्सचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया.

1. लिंबू आइस्ड ग्रीन टी

ग्रीन टी अँटिऑक्सिडंटने समृद्ध आहे. यामध्ये इन्सुलिन असते. लिंबाच्या रसात मिसळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच शरीर हायड्रेट राहते.

summer Hydrate Drink
Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावल्याने काय होते?

2. काकडी पुदिना ड्रिंक

काकडीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते. तसेच पाण्याचे (Water) प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेट राहण्याचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये पुदिन्याची पाने घालून प्यायल्याने चव वाढते. तसेच रक्तातील साखरेची पातळी निंयत्रणात राहिल.

3. टरबूज-तुळशी ड्रिंक

टरबूज हे नैसर्गिकरित्या गोड आणि हायड्रेटिंग आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात (Summer Season) आहारात याचा अधिक समावेश करायला हवा. तुळशीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. याचे ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये राहाते.

summer Hydrate Drink
Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल कमी

4. नारळ पाणी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट राहण्यासाठी नारळपाणी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइट्स आणि कमी कर्बोदके असतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com