Cold Water Effects : रखरखत्या उन्हातून आल्यावर तुम्हीही फ्रिजचं पाणी पिताय; आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम

Summer Health Tips : फ्रिजचं पाणी प्यायल्याने तात्काळ डोकं शांत होतं. तसेच तहान पूर्ण होते. मात्र असं केल्याने आपल्या आरोग्यावर याचा वेगळा परिणाम होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Summer Health Tips
Cold Water Effects Saam TV
Published On

उन्हाळ्यात साधं पाणी प्यायल्याने आपली तहान भागत नाही. आणखी आणि सतत पाणी प्यावसं वाटतं. रखरखत्या उन्हात प्रवास करताना जिवाची लाहीलाही होते. त्यामुळे उन्हातून बाहेर आल्यालवर आपण पटकन फ्रिजचं पाणी पितो. फ्रिजचं पाणी प्यायल्याने तात्काळ डोकं शांत होतं. तसेच तहान पूर्ण होते. मात्र असं केल्याने आपल्या आरोग्यावर याचा वेगळा परिणाम होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?

Summer Health Tips
Eating Ginger in Summer: उन्हाळ्यात आल्याचे सेवन केल्यामुळे होतात 'हे' गंभीर आजार

पचनाच्या समस्या

आपली पचनक्रिया शरिरातील तापमानावर अवलंबून असते. शरिरातील तापमान योग्य असणे गरजेचं असतं. जेव्हा तापमान जास्त प्रमाणात कमी होतं तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्या पोटातील पचनक्रिया बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यावर काही जण कोमट पाणी पितात. मात्र असं करणे चुकीचं आहे. त्यासाठी उन्हाळ्यात थेट बर्फ झालेलं पाणी पिऊ नका.

गळ्यात खवखव

ज्या व्यक्ती उन्हातून आल्याबरोबर लगेच फ्रिजमधील पाणी पितात त्याचा परिणाम त्यांच्या घशावर होतो. जास्त थंड पाणी प्यायल्याने डोके दुखीसह, घशात खवखव होण्यास सुरुवात होते. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास त्रास आणखी वाढतो आणि सर्दी तसेच खोकल्याच्या समस्या निर्माण होतात.

हृदयाच्या समस्या

थंड पाणी प्यायल्याने हृदयासंबंधीत समस्या देखील वाढतात. थंड पाणी प्यायल्याने मज्जातंतूवर परिणाम होतो. यामुळे हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ लागतात. त्यामुळे हाय किंवा लो बीपी असलेल्या व्यक्तींनी चुकूनही थंड पाण्याचे सेवन करू नये.

हाडे ठिसूळ होतात

सध्या ४० शी नंतर अनेकांना गुडघे दुखी, सांधेदुखीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. आधीपासून कायम फ्रिजमधील पाणी प्यायल्याने त्या व्यक्तींना हाडे ठिसूळ होण्याच्या समस्या उद्भवतात. तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती किंवा आई बाबांना या समस्या असतील तर आजपासून त्यांना फ्रिजमधील पाणी पिण्यास बंदी करा.

टीप : उन्हाळ्यातील आरोग्यासंबंधीत टिप्सबाबत ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Summer Health Tips
Summer Health Tips: उन्हाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी आहार कसा असावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com