Ruchika Jadhav
सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हामुळे नागरिकांच्या जीवची पार लाहीलाही झालीये.
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
उष्णता वाढत असल्याने सर्वांनाच तहान भागवण्यासाठी थंडगार पाणी प्यावे वाटते.
मात्र फ्रीजच्या पाण्याव्यातिरिक्त विविध पद्धतीने तुम्ही थंड पाणी मिळवू शकता.
गावी थंड पाण्यासाठी काळ्या मातीपासून बनलेलं रांजन वापरलं जातं.
तर शहरांमध्ये वापरण्यासाठी तुम्ही मातीचं अशा प्रकारचं नळ असलेलं मडकं घेऊ शकता.
प्रवासात थंड पाणी पिता यावं यासाठी मातीपासून बनलेली बॉटल वापरू शकता. याने तुम्हाला थंड पाणी पिता येईल.
तसेत फ्रीजच्या थंड पाण्याने होणाऱ्या समस्या म्हणजे सांदे दुखी कधीच जाणवणार नाही.