Kidney health: किडनीच्या आजाराने त्रस्त आहात? मग या 5 पदार्थांपासून राहा चार हात लांब

Kidney disease diet: किडनीचा आजार असल्यास आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जास्त मीठ, लाल मांस, दुग्धजन्य पदार्थ, पोटॅशियमयुक्त फळे आणि सॉफ्ट ड्रिंक्स किडनीवर ताण वाढवू शकतात. किडनीच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत आणि आहारात कोणते बदल करावेत, जाणून घ्या.
Kidney health
Kidney healthsaam tv
Published On

आपल्या शरीरातील किडनी हा महत्वाचा घटक आहे. रक्तातील घाण आणि शरीराला नको असलेले घटक गाळून बाहेर काढण्यासोबतच शरीरातील पाण्याचं संतुलन आणि आवश्यक खनिजांचं प्रमाण योग्य ठेवण्याचं काम किडनी करतात. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी झाली असेल तर आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.

काही पदार्थांमुळे किडनीवर अधिक ताण येऊ शकतो आणि आजाराची समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात काही पदार्थ शक्यतो टाळणं किंवा त्यांचं प्रमाण कमी करणं महत्त्वाचं आहे. असे कोणते पदार्थ आहेत जे किडनीच्या आरोग्यासाठी टाळले पाहिजेत ते पाहूयात.

जास्त मीठ असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ

चिप्स, पॅकेज्ड स्नॅक्स, कॅनमधील सूप, इन्स्टंट नूडल्स, लोणची, फास्ट फूड अशा पदार्थांमध्ये सोडियम म्हणजेच मीठाचं प्रमाण खूप जास्त असतं. शरीरात सोडियमचं प्रमाण वाढलं की रक्तदाब वाढू शकतो. तसंच शरीरात पाणी साचण्याची शक्यता असते. यामुळे आधीच कमजोर झालेल्या किडनीवर अधिक कामाचा ताण येतो. त्या

Kidney health
High cholesterol symptoms: पायांमध्ये ही 6 लक्षणं दिसतायत? हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याचे शरीर देतंय संकेत

लाल मांस

बीफ, पोर्क आणि लॅम्ब म्हणजेच लाल मांसामध्ये प्रोटी आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतात. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यावर हे घटक शरीरातून योग्य प्रकारे बाहेर टाकणं कठीण होऊ शकतं. विशेषतः जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्यास शरीरात तयार होणारे टाकाऊ घटक रक्तात जमा होऊ शकतात. हे बाहेर काढण्यासाठी किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध, चीज, दही यांसारखे पदार्थ आरोग्यासाठी पौष्टिक मानले जातात. मात्र त्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाणही असतं. किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील या खनिजांचं संतुलन बिघडू शकतं. त्याचा परिणाम हाडं आणि हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

केळी आणि पोटॅशियम जास्त असलेली फळं

किडनी शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर काढण्याचं काम करतं. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण वाढू शकतं. केळी, संत्री, अवोकॅडो आणि बटाटे यांसारख्या पदार्थांमध्ये पोटॅशियम जास्त असतं. शरीरातील पोटॅशियम खूप वाढल्यास स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो. काही वेळा हृदयाच्या ठोक्यांच्या लयीतही गंभीर बदल होऊ शकतात.

Kidney health
Skipping dinner and cholesterol: रात्रीचं जेवण टाळल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी दिलं उत्तर

सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोला

कोला किंवा इतर सॉफ्ट ड्रिंक्समध्ये अनेकदा फॉस्फरसयुक्त पदार्थ मिसळलेले असतात. हे पदार्थ चव आणि पेय जास्त काळ टिकवण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारचे फॉस्फरसयुक्त घटक शरीरात तुलनेने लवकर शोषले जाऊ शकतात. त्यामुळे रक्तातील फॉस्फरसचं प्रमाण वाढू शकतं. याचा परिणाम किडनीसोबतच हाडांच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

किडनीच्या आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्या

किडनीचा आजार असल्यास योग्य आहार घेणं हे उपचारातील महत्त्वाचं पाऊल आहे. मीठाचं प्रमाण कमी करणं, लाल मांस आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणं, ताज्या घरगुती पदार्थांना प्राधान्य देणं अशा छोट्या-छोट्या बदलांचा फायदा होऊ शकतो. योग्य आहारामुळे किडनीवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यास आणि आजाराची प्रगती संथ ठेवण्यास मदत होऊ शकते.

Kidney health
Bad Cholesterol : पावसाळ्यात वाढतंय बॅड कोलेस्ट्रॉल, हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी खा 'ही' १ सुपरहेल्दी भाजी

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com